जाफराबाद – तालुक्यात शिवसेना प्रणित दलित सेना, शिवसेना, युवा सेना व किसान सेना यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संघटन विस्तार, सामाजिक प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी आणि युवकांच्या प्रश्नांसह आगामी जनहित उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक पातळीवर संघटना अधिक मजबूत करून सर्वसामान्यांपर्यंत योजनांचा लाभपोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीत दलित सेनेचे जिल्हा संघटक अॅड. भास्करराव मगरे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. त्यांनी सामाजिक न्याय आणि संघटनात्मक एकजूट कायम ठेवून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज अधोरेखित केली. शिवसेना तालुका प्रमुख दत्ता पाटील बंगाळे यांनी तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवर प्रकाश टाकत कार्यकत्यांना अधिक सक्रिय राहण्याचे आवाहन केले.
युवा सेना तालुका प्रमुख बालाजी पवार यांनी युवकांच्या सहभागामुळे संघटनेला नवी दिशा मिळत असल्याचे सांगितले. किसान सेनेचे प्रतिनिधी सुभाष भोपळे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी, शेतीचा वाढता खर्च आणि बाजारभावाबाबत सविस्तर मते मांडली. दलित सेना तालुका प्रमुख विजय मोरे यांनी सामाजिक समतेसाठी विविध उपक्रम राबवण्याची गरज व्यक्त
याप्रसंगी शहर प्रमुख फारुख भैय्या, एक अजीम, प्रदीप जाधव, कैलास राऊत, गजानन खंबाट, राजीव रमणे, यशवंत गोपने, उमेश गायकवाड, समीर पठाण, शिवम शुक्ला समाधान खिल्लारे भागवत काकडे आणि जमदाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी काळात सामाजिक उपक्रम, जनजागृती मोहिमा आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे या बैठकीत ठरवण्यात आले.



















