माहूर – शासनाकडून अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे नुकसानीचे अनुदान ई पंचनामा पोर्टल मार्फत पात्र लाभार्थ्यांना वितरीत केले जाते. परंतु मागील दोन ते तीन वर्षाचे अनुदान काही लाभार्थ्यांना मिळाले नसल्याच्या तक्रारी कार्यालयास येत असल्याने दि.१०/०२/२०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता तहसील कार्यालय, माहूर येथे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कॅम्पला माहूर तालुक्यातील मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी (पूर्वीचे पदनाम तलाठी) उपस्थित राहणार असुन अनुदानासंबंधीच्या तक्रारीचे निवारण करण्यात येणार असल्याने या कॅम्पला ज्या लाभार्थ्यांना सन २०२२ ते २०२५ पर्यंतचे अतिवृष्टी व अवकाळी पावसाचे अनुदान मिळाले नाही, त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अभिजीत जगताप तहसीलदार, माहूर यांनी केले आहे.



















