मोहोळ – तालुक्यातील पेनुर येथे जिल्हा परिषदेच्या उमेदवाराच्या घरासमोर मतदानाच्या आदल्या दिवशीच अघोरी पूजेचे साहित्य निदर्शनास आल्यामुळे गावात एकच खळबळ उडाली
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे प्रचाराच्या अंतिम टप्पा पूर्ण झाला असून प्रचाराची मुदत संपल्यानंतर मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळीजिल्हा परिषद पेनुर गटाची उमेदवार चरण चौरे यांच्या गावातील भर वस्तीत असणाऱ्या घराबाहेर पुरणपोळी हळदी कुंकू लिंबू त्याला टाचण्या टोचलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांनी छापलेले प्रचार पत्र त्यास टाचण्या टोचलेल्या हे सर्व साहित्य एका नवीन कपड्यात बांधून पहाटेच्या वेळी कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांच्या घराच्या बाहेर ठेवलं होतं सकाळी उठल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी ते सर्व साहित्य पाहिलं आणि त्यांच्यामध्ये घबराट निर्माण झाली यानंतर जिल्हा परिषदेचे उमेदवार यांनी बाहेर घेऊन हा प्रकार पाहिला आणि तेही आश्चर्यचकित झाले हा अघोरी पुजेचा प्रकार कोणी केला का केला याबाबत पेनूर परिसरात उलट सुलट चर्चा सुरु झाली पेनूर गटतून चरण चवरे निवडून येवू नये म्हणून कुणी केला काय ? अशीही चर्चा सुरु झाली आहे .
याबाबत बोलताना चरण चवरे म्हणाले की असे प्रकार करून मत मिळत नसतात निवडून येण्यासाठी कामच करावे लागते उपमुख्यमंत्री शिंदे साहेब येथे येऊन सभा घेतली आमदार राजाभाऊ खरे प्रचाराला आले हे माझ्या साठी भरपूर झाले मी कामेही केलेले आहे असे सांगत विरोधी उमेदवारावर त्यांनी निशाणा साधला ते म्हणाले की विरोधात उभ्या असलेल्या उमेदवारला प्रचारासाठी त्यांच्या नेत्यालाही गावात आणले नाही त्यांनीच येवू दिले नाही अनगरकर गावात प्रचाराला आले तर माझी मत घटतील अस तेच म्हणतात असे चवरे म्हणाले पुढे बोलताना ते म्हणतात मी घाबरणारा नाही उलट त्या लिंबाचे सरबत करून पिवू शकतो अशा त्यांच्या वक्तव्या वरून ते या कृत्याने जराही विचलित झालेले दिसले नाही.



















