माळशिरस – श्रीनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज माळशिरस याठिकाणी बारावीतील विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्येची देवता सरस्वती प्रतिमेचे पूजन संस्थाध्यक्ष मा.डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.तदनंतर बारावीतील विद्यार्थ्यांनी आपले शिक्षक व विद्यालयाबद्दल वाटणारा आदर यावेळी व्यक्त केला.त्यानंतर सचिन बोरावके, मुख्याध्यापक मधूकर गुंड, प्राचार्य योगेश गुजरे व संस्थाध्यक्ष .आप्पासाहेब देशमुख यांनी मनोगत मांडले. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संस्थाध्यक्ष.डॉ.आप्पासाहेब देशमुख, संचालक रावसाहेब देशमुख, महादेव माने, महेश बोत्रे, निलेश घाडगे, बाबासाहेब माने, अनिरुद्ध शिंगाडे, सर्जेराव पाटील, मुख्याध्यापक मधुकर गुंड, प्राचार्य योगेश गुजरे, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, परिसरातील बहुसंख्य पालकवर्ग उपस्थित होता.



















