Saturday, May 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पदवीधर, पर्यावरणप्रेमी ज्ञानेश्वरी देवकर झाल्या उपमहापौर

तरुण भारतbyतरुण भारत
February 7, 2026
in solapur
0
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : पदवीधर, पर्यावरणप्रेमी व पहिल्यांदा नगरसेविका झालेल्या ज्ञानेश्वरी देवकर यांना उपमहापौरपदाची संधी मिळाली आहे. नूतन उपमहापौरांचा परिचय पुढीलप्रमाणे आहे. प्रभाग क्रमांक 23 मधून त्या निवडून आल्या आहेत. त्या भाजप दक्षिण-पश्चिम मंडल अध्यक्ष महेश देवकर यांच्या पत्नी आहेत. बी.ए.समाजशास्त्र विषयात त्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. सुशिक्षित, अभ्यासू आणि सामाजिक जाणीव असलेल्या नेतृत्वाच्या त्या प्रतिनिधी आहेत.

मूळ माहेर धाराशिव जिल्ह्यातील कावळेवाडी, तर सध्या सोलापूर ही कर्मभूमी आहे. लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड जपत गणेशोत्सव मंडळापासून ते भाजप मंडलाध्यक्षा असा त्यांचा प्रेरणादायी प्रवास आहे.शैक्षणिक जीवनात असतानाच राष्ट्रीय सेवा योजना  माध्यमातून वृक्षलागवड, समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. तसेच इको नेचर  निसर्ग संवर्धन सहकारी संस्था स्थापनेत प्रवर्तक म्हणून योगदान देत, त्या एक पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात.

शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे समभाव, एकजूट, स्वराज्यनिती, वृक्षसंवर्धनाची आज्ञापत्रे या मूल्यांचा प्रसार करत वृक्षलागवड, आरोग्य शिबिरे, शासकीय योजनांचा लाभ गरजूंना मिळवून देणे असे कृतीशील उपक्रम राबवले आहेत.

दरवर्षी भगवद्गीता, शिवमहापुराण प्रवचन, भजन यांसारखे आध्यात्मिक उपक्रम सातत्याने राबवले जातात. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या विचारांनुसार विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप त्यांच्याकडून करण्यात येते.

महात्मा बसवेश्वर महाराजांचे “कायकवे कैलास” (कामातच कैलास)

हा कर्मनिष्ठेचा संदेश, तसेच जय सेवालाल महाराज, संत रोहिदास महाराज यांच्या मानवतेच्या विचारांवर आधारित सामाजिक उपक्रम सातत्याने राबवले जातात. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणेतून मंदिर संवर्धन, आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा जपण्याचे कार्य सुरू असून सोलापूर विद्यापीठ परिसरात हजारो वृक्षलागवड केली आहे.

सोलापूरचे सुपुत्र अरण्यऋषी पद्मश्री कै. मारुती चितमपल्ली यांच्या निसर्गसंवर्धनाच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी युवकांना प्रेरणा देण्याचे काम त्या करीत आहेत.

प्रभाग क्रमांक 23 मधील सिद्धेश्वर वनविहार (सुमारे 400 एकर जैवविविधतेने नटलेला परिसर) याचे संवर्धन व पर्यटन स्थळ म्हणून विकास करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. “निसर्ग हाच गुरु – मानवता हाच धर्म – सेवा हेच कर्म”या विचाराने प्रेरित होऊन लोकसहभाग, लोकमत आणि मार्गदर्शनाच्या बळावर सेवा कार्य अखंड सुरू राहील.

 आमदार सुभाष देशमुख साहेब आणि  मनीष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरातील प्रश्न सोडवून सर्वांगीण विकासाचा संकल्प सातत्याने पुढे नेण्यात येईल. प्रभाग व सोलापूर शहराला नव्या उंचीवर नेणारा विकास निश्चित घडवून आणला जाईल, हा विश्वास त्या सर्व नागरिकांना देत आहोत.

वृक्षलागवड व संवर्धनाचे कार्य संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे”

या विचारांनी प्रेरित असलेल्या उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर या सोलापूर शहरातील शाळा, महाविद्यालय परिसरात सातत्याने वृक्षलागवड व संवर्धनाचे कार्य सुरू आहे. त्याचबरोबर सोसायटीतील नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात.

कोरोना महामारीच्या कठीण काळात हजारो रुग्ण, गरजू व निराधार कुटुंबांना धान्य किट, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच पूरग्रस्त परिस्थितीतही मदतीचा हात पुढे करत नागरिकांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.

डॉल्बीमुक्त कार्याचा प्रशासनाकडून गौरव 

“वसुधैव कुटुंबकम्” या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन वर्षभर विविध भारतीय सण-उत्सव सर्व समाजघटकांना एकत्र आणत, एकजूट, बंधुता व सामाजिक सलोखा जपण्याचे कार्य ज्ञानेश्वरी देवकर यांच्याकडून सुरू आहे. सोलापूर शहरात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करून सामाजिक भान जपणारा आदर्श निर्माण केला. या उपक्रमाची दखल घेत महाराष्ट्र पोलीस प्रशासनाकडून त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

Post Views: 82
Previous Post

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत तिरुपती बालाजी देवदर्शनाचा प्रेरणादायी उपक्रम

Next Post

अनुभव, विश्वास आणि विकासाची त्रिसूत्री हृदयात सेवा, कारभारात शिस्त – नूतन महापौर विनायक कोंड्याल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अनुभव, विश्वास आणि विकासाची त्रिसूत्री हृदयात सेवा, कारभारात शिस्त - नूतन महापौर विनायक कोंड्याल

ताज्या बातम्या

जिल्हापरिषदेच्या सीईओनी केले नो व्हेईकल डे चे आवाहन #solapurnews

May 16, 2026

इस्लापूर येथे जलजीवन मिशनच्या मेन लाईनला गळती #marathinews

May 16, 2026

कळंब येथे बिर्याणी सत्याग्रह अनोखे आंदोलन #marathinews

May 16, 2026

महापालिकेत पगाराला विलंब कामगारांचा कामबंदचा इशारा #solapurnews #viral

May 16, 2026

महापालिकेत पगाराला विलंब कामगारांचा कामबंदचा इशारा #viral #solapurnews

May 16, 2026

आमचं पुन्हा ठरलं महापालिका आयुक्त आणि सभापती जाणार डेन्मार्क दौऱ्यावर #solapurnews

May 16, 2026

दिव्यांगांचे तात्पुरते प्रमाणपत्र असेल तर सर्व योजना होणार बंद #solapurnews #marathinews

May 16, 2026

वाहनांना १ जुलैपासून ‘एचएसआरपी’ प्लेट अनिवार्य; नियमभंग केल्यास १,००० रुपयांचा दंड #marathinews

May 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0866747

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697