सोलापूर – पद्मशाली शिक्षण संस्था संचालित, डी. आर. श्रीराम इंग्लिश मीडियम शाळेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी दिनांक 23.8.2024 रोजी बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांच्या शुभहस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झालेला होता. आज संस्थेने केलेल्या संकल्पानुसार त्या वास्तूचे बांधकाम पूर्ण झाल्याने वास्तुशांतीचा कार्यक्रम पार पडला. या शाळेची स्थापना 1974 मध्ये जेंव्हा झाली तेंव्हा पूर्व भागातील इंग्रजी माध्यमाची एकमेव शाळा होती. या शाळेला स्वतंत्र इमारत नसताना साखर पेठेतील नारायणराव कुचन प्राथमिक शाळेत ही शाळा भरत होती. त्यानंतर संस्थेच्या स्वतंत्र जागेवर वास्तू बांधण्यात आली. दिवसेंदिवस विद्यार्थी संख्या वाढत गेली. त्यानुसार वर्ग वाढविण्यात आले. इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण देण्याची सुविधा या शाळेत आहे.
याप्रसंगी देणगीदार अमित श्रीराम यांनी या वास्तुशांती प्रसंगी शाळेसाठी पाच लाख रुपये देणगी देणार असल्याचे जाहीर केले.
संस्था शतकोत्तर वाटचाल करत असून काळानुरुप आधुनिक शिक्षण देण्याचा प्रयत्न नेहमी करत असते. या शाळेत सहशालेय उपक्रम राबवण्यात येतील असे नृत्य, चित्रकला, संगीत यासारखे विषय घेतले जातील तसेच भविष्यात इयत्ता अकरावी कॉमर्स व सायन्स सुरू करण्याचा मानस आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्याकडून दिली जाते. शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल विद्यार्थी व पालकांप्रती असलेली तळमळ ही कौतुकांस पात्र आहे. बदलत्या काळानुसार संस्था शिक्षण देत असल्याने अनेक विद्यार्थी या शाळेतून संस्थेतून घडत आहेत हे फार मोठे योगदान आहे असे संस्थेविषयी गौरवोद्गार उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली, संस्थेच्या कार्याला सदिच्छा दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास अंबाजी गुर्रम, हरिबाबू येले, प्रवीण पोटाबत्ती, काशिनाथ गड्डम, सुरेश फलमारी , डी आर श्रीराम इंग्लिश मिडियम स्कूल पालक संघाचे सचिव प्रवीण कांबळे, अतुल कोटा, नागनाथ सोमा, लक्ष्मीनारायण कमटम, राजमहिंद्र कमटम, मोहन कमटम, शशिकांत केंची, सुरेखा बोमड्याल, संतोष सोमा, श्रीधर गुंडेली, यादगिरी कोंडा, डॉ. गुल्लापल्ली, अविनाश कोंडा, किरण सोमा, दत्तात्रय श्रीराम, सत्यनारायण वंगा, माजी प्राचार्य राजेंद्र शेंडगे, अमृतदत्त चिन्नी, लक्ष्मीनारायण कुचन, रमेश विडप, सुरेश श्रीराम, श्रीहरी कोटा, अनिल कन्ना, रमेश अलवाल, अविनाश संगा, अनिल कुमार जनाराम, उमापती मिठ्ठापल्ली, नागेश कोंगारी, अरुणा कन्ना, भारती सग्गम, श्रीनिवास गड्डम, तसेच संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. श्रीनिवास कोंडी, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम, खजिनदार गोवर्धन कमटम, विश्वस्त दिनेश यन्नम, पांडुरंग दिड्डी, नागनाथ गंजी, श्रीधर चिट्याल, व्यंकटेश आकेन, विजयकुमार गुल्लापल्ली, मधुकर कट्टा, सौ. संगीता इंदापुरे,नागनाथ श्रीरामदास, रमेश बोध्दूल, प्रभाकर अरकाल, श्रीनिवास जोग, श्रीनिवास गड्डम, गणेश गुज्जा, हरीष कोंडा, रामदास इप्पाकायल, अंबादास गज्जम, श्रीनिवास इप्पाकायल, अमित श्रीराम, अरविंद कुचन, निलेश सरगम, यशवंत इंदापुरे तसेच मुख्याध्यापक सौ. अजिता पिल्लाई तसेच संस्थेचे सर्व शाखेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक- शिक्षकेतर सेवक वर्ग इत्यादींची उपस्थिती होते.

























