पिलीव – येथील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व रमेश खलीपे ज्युनिअर कॉलेजमधये माजी उपमुख्यमंञी तथा रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य अजित पवार यांच्या अपघाती दुखःद निधनाबद्दल शोकसभेत आयोजन करण्यात आले होते .
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बागल सर, पर्यवेक्षक रमेश किरगत सर, दामोदर लोखंडे ,संजय पाटील, शाहरुख मुलाणी ,यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते .यावेळी दामोदर लोखंडे यांनी अजित पवार यांचा जीवनप्रवास सविस्तरपणे मांडला .तसेच झाडे सर यांनीही अजित पवार यांचे कार्य सांगत आठवणींना उजाळा दिला .सुञसंचालन सत्यवान वाघमारे यांनी केले .
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांना अभिवादन करताना मुख्याध्यापक अशोक बागल सर, रमेश किरगत, संजय पाटील, दामोदर लोखंडे व इतर मान्यवर.
























