Wednesday, June 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जिल्हा परिषदेची निवडणूक ही संपूर्ण समाज व आरपीआयचे एकवटलेल्या नेत्यांनी खेचून आणलेला विजय

तरुण भारतbyतरुण भारत
February 15, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वेळापूर – नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पं. स. निवडणूक निकालानंतर काही निकाल लक्षात रहाणारे व राजकीय सामाजिक घडामोडी वर विचार करायला लावणारा निकाल म्हणजे वेळापूर जिल्हा परिषद निवडणुकीत सौ मिनाक्षी मिलिंद सरतापे यांचा दणदणीत  झालेला विजय हा माळशिरस तालुक्यात चर्चेत राहिलेला निकाल मानला जातो.

      कारण या वेळापूर जिल्हा परिषद गटाची निवडणूक ही संपूर्ण वेळापूर गटात जनतेने व संपूर्ण आरपीआयचे नेत्यांनी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष शिवसेना उबाठा, शेतकरी संघटना पक्ष, प्रहार संघटना व इतर अनेक लहान मोठ्या संघटनांनी एकमुखी सशर्त पाठिंबा दिल्यामुळे सौ मिनाक्षी सरतापे यांचा विजय झाला आहे .

       वास्तविक पाहता केंद्रात राज्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांची भाजप बरोबर गेल्या आठ वर्षांपासून युती आहे मात्र केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना केंद्रात राज्यमंत्री पद दिले असले तरी त्यांच्या पक्षातील नेत्यांना कार्यकर्त्यांना निवडणुकीत कुठेही स्थान दिले जात नाही निवडणुकीत सन्मानपूर्वक जागा वाटपात कुठेही सामावुन घेतले जात नाही स्थानिक स्वराज्य संस्था असो लोकसभा विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे आठवले पक्षाला निवडणुकीत वापरून घेतले जाते पण सत्तेची, लाभाची पद दिली जात नाहीत. रामदास आठवले यांच्या आदेशानुसार आता पर्यंत कार्यकर्ते नेते भाजपला निवडणुकीत सहकार्य मदत करत आलेले आहेत. भाजपकडे रिपब्लिकन पक्षाला निवडणुकीत योग्य न्याय जागा मिळाल्या पाहिजेत ही माफक अपेक्षा असताना भाजप केवळ वापरा व बाजूला ठेवा या भुमिकेत राहिली आहे त्यामुळे या सर्वांचा परिपाक असा झाला की राज्यभरातील रिपब्लिकन पक्षाचे नेत्यांत कार्यकर्त्यां मध्ये प्रचंड असंतोष व चिड निर्माण झाली ही बाब रामदास आठवले यांनी भाजपचे वरिष्ठ सुत्रांकडे वारंवार कळवूनही भाजपने कसलीही दाद दिली नाही. त्यामुळे चिडलेल्या व नाराज असलेल्या स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांनी आरपीआयचे वरिष्ठांना कळवून भाजपला निवडणुकीत सहकार्य करायचे नाही व जो समविचारी पक्ष निवडणुकीत योग्य न्याय देऊन जागा देईल त्या पक्षा बरोबर स्थानिक आघाडी करून निवडणूक लढवल्या त्याचा चांगला परिणाम व फायदा झाल्याचे चित्र पहायला मिळालं 

 यानिमित्ताने रिपब्लिकन ऐक्याचे दर्शन पाहायला मिळालं  महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी भाजपचे विरोधात रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्त्यांनी आघाडी करून निवडणूक लढवल्या व यश संपादन केले आहे. माळशिरस तालुक्यात त्याचाच परिणाम म्हणून वेळापूर जिल्हा परिषद गटात आरपीआयचे सर्व नेते कार्यकर्ते मोठ्या हिमतीने ताकदीने एकवटले तसेच आरपीआयचे तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे यांचा मोठा जनसंपर्क विनम्र स्वभाव तसेच सर्व जाती धर्मातील बहुजन समाजांतील सर्वांशी असलेले त्यांचे मैत्रीचे संबंध तसेच वेळापूर पंचक्रोशीतील सामाजिक प्रश्न नागरीसुविधा मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न यामुळे मिलिंद सरतापे यांच्या सौभाग्यवती मिनाक्षी सरतापे यांना वेळापूर जिल्हा परिषद गटात उमेदवारी द्यावी म्हणून सर्वानुमते पसंती मिळाली आणि या उमेदवाराला प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  माळशिररसचे आमदार उत्तमराव जानकर, खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आरपीआयचे नेते कार्यकर्ते यांनी प्रामाणिक प्रयत्न केला त्यामुळे वेळापूर जिल्हा परिषद गटात सौ मिनाक्षी मिलिंद सरतापे यांचा चांगल्या मताधिक्याने विजय झाला.

माळशिरस तालुक्यात सर्व बौद्ध समाज सर्व आरपीआयचे नेते कार्यकर्ते एकवटले त्यामुळे आरपीआयचे नेते वरिष्ठ पदाधिकारी यांचे काही चालले नाही त्यामुळे मिनाक्षी मिलिंद सरतापे यांचा विजय म्हणजे भाजपला दिलेली मोठी चपराक मानली जाते.

Post Views: 43
Previous Post

दिव्यांग नाट्य स्पर्धेत नॅब संस्थेतील कलाकारांनी मिळवले नाटय स्पर्धेत यश 

Next Post

विदेशी दारूची बनावट लेबले तयार करणारी अंतरजिल्हा टोळी जेरबंद

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

विदेशी दारूची बनावट लेबले तयार करणारी अंतरजिल्हा टोळी जेरबंद

ताज्या बातम्या

जीवनाचे सार्थक करायचे असेल तर शिव आराधनेचा अंगीकार करा  : भालचंद्र महाराज 

जीवनाचे सार्थक करायचे असेल तर शिव आराधनेचा अंगीकार करा  : भालचंद्र महाराज 

June 10, 2026
राज्यात सोलापूरची रेकॉर्डब्रेक कामगिरी ; ५ दिवसांत २० हजार कार्डची नोंदणी !

राज्यात सोलापूरची रेकॉर्डब्रेक कामगिरी ; ५ दिवसांत २० हजार कार्डची नोंदणी !

June 10, 2026

सीईटी-पीसीबी परीक्षेत वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश

June 10, 2026

सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक!

June 10, 2026
नेत्र आरोग्य व नेत्रदान जनजागृतीसाठी सोजर फार्मसीचे विशेष शिबीर यशस्वी 

नेत्र आरोग्य व नेत्रदान जनजागृतीसाठी सोजर फार्मसीचे विशेष शिबीर यशस्वी 

June 10, 2026

स्मार्ट सिटीत कचरा उचलण्याबाबत दुर्लक्ष 

June 10, 2026

मनपा क्षयरोग अधिकारी डॉ. हराळकर यांच्यावर कारवाईची मागणी

June 10, 2026
एन बी नवले सिंहगडच्या विद्यार्थ्यांची आयटी क्षेत्रात दमदार झेप

एन बी नवले सिंहगडच्या विद्यार्थ्यांची आयटी क्षेत्रात दमदार झेप

June 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0902757

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697