जेऊर – अक्कलकोट येथील स्वामी समर्थ देवस्थान समितीच्या वतीने संतपरंपरेचे प्रतीक मानली जाणारी पगडी प्रदान करून प्रा. गणेश करे-पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
करे पाटील यांनी कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल मानद पीएचडी पदवी संपादन केल्याबद्दल हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला .
स्वामी समर्थ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते प्रा. करे-पाटील यांना संतांची पगडी,स्वामी महाराज कृपा-वस्त्र देऊन गौरविण्यात आले. आपल्या भाषणात महेश इंगळे म्हणाले की यशकल्याणी सेवाभावी संस्था, पुणेचे संस्थापक अध्यक्ष तथा माइक्रोबायोलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचे सदस्य प्रा. करे-पाटील यांनी केलेले संशोधनकार्य, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याचे प्रयत्न आणि ग्रामीण भागातील शैक्षणिक उन्नतीसाठी केलेले योगदान विशेष कौतुकास्पद असुन त्यांनी केलेल्या या प्रयत्नांना यापूर्वी विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थानी पुरस्कार देऊन प्रोत्साहन दिले आहे. स्वामी समर्थ देवस्थानचे वतीनेही त्यांना समाजरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
या प्रसंगी प्रास्ताविक प्रा.बाळकृष्ण लावंड यांनी केले., गुरुनाथ मुचंडे, प्रा.बसय्या हिरेमठ, प्रा. कल्याणराव साळुंके या मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व संशोधन क्षेत्रातील कार्याचा गौरवपूर्वक उल्लेख केला.
आभार प्रा.सुरेश पिरगुंडे यांनी मानले
सत्कार समारंभास मंदिर समितीचे विश्वस्त तथा करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती संपतराव उर्फ भारत शिंदे, सोलापूर जिल्हा इंग्लिश टीचर्स असोसिएशनचे अध्यक्ष बाळकृष्ण लावंड, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. गुरुनाथ मुचंडे, अक्कलकोट तालुका संघटनेचे अध्यक्ष प्रा. बसय्या हिरेमठ, पक्षीमित्र तथा करमाळा तालुका इंग्लिश शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा. कल्याणराव साळुंके, जीवन शिक्षण फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. जयेश पवार, प्रा. सुरेश पिरगुंडे, प्रा. सचिन काटे, यशवंत परिवाराचे प्रा. विष्णू शिंदे, प्रा. गोपाळ तकिक, प्रा. मारुती जाधव, प्रा. विजयकुमार वणवे, प्रा. निवृत्ती बांडे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी तसेच अक्कलकोट येथील विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी व स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. करे-पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले कीस्वामी समर्थांच्या पुण्यभूमीत होणारा हा सन्मान विशेष असून समाजातील शिक्षकवर्ग, विद्यार्थी आणि सहकाऱ्यांचा हा सन्मान असल्याचे नमूद केले. भविष्यातही संशोधन, शिक्षण व समाजसेवा यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.


























