अक्कलकोट – येथील मधला मारुती मधील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात ‘त्रिमूर्ती महाशिवरात्री’ ही निराकार परमात्मा शिवाच्या अवतरणाचा महोत्सव म्हणून भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
प्रारंभी रविवारी सकाळी नऊ वाजता शिव ध्वजारोहण नगरसेवक देविदास कवटगी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी नगरसेविका शैलजा स्वामी, मैंदर्गीचे नगरसेवक मुत्तण्णा करजगी, उदयोगपती सचिन किरनळ्ळी, पत्रकार विरूपाक्ष कुंभार, डॉ. बसवराज चिनकेकर उपस्थित होते.आयोजित सभेत बी. के. राणी बहनजी व बी. के. जगदेवी यांनी तिलक लावून व पुष्पगुचछ देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
अक्कलकोट ब्रह्मकुमारी सेवा केंद्राचे संस्थेचे संचालिका बी. के. सुमन बहीणजी यांनी संस्था परिचय आणि महाशिवरात्रीचे रहस्य सांगून आपल्या वाणीने मंत्रमुग्ध केले. त्यांनी उपस्थितांना राजयोग ध्यान, अध्यात्मिक प्रवचन, दीप प्रज्वलन आणि आपल्यातील काम, क्रोध, लोभ यांसारख्या विकारांना शिवाला अर्पण करण्याचा संदेश दिल्या. तसेच ब्रह्माकुमारी संस्था महाशिवरात्रीला केवळ एक उपवास नसून परमात्मा शिवाच्या निराकार रुपात अवतरण दिवस मानते, म्हणूनच याला “महाशिवरात्र महोत्सव” असेही म्हटले जाते. या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण करण्याऐवजी मानवी मनातील ५ विकार (काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार) शिवावर अर्पण करून स्वतःला पवित्र करण्याचा संकल्प करावे. ‘शिव संदेश यात्रा’ काढून समाजात सकारात्मकता, आत्मशांती, राजयोग ध्यान आणि नैतिक मूल्यांचा संदेश देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमास पाठशाला तील भाई दीपक मचाले, बी. के. इराणा विजापूरे भाई, बी. के. श्रीमंत भाई, रतन बाबशेट्टी, हणमंत कोतले, काळे आणि समर्थ बाबशेट्टी याचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली जाजू केले. शेवटी मान्यवारचे आभार वैशाली नन्ना यांनी केले. शेवटी उपस्थित सर्वांना ईश्वरीय फराळाचे प्रसाद देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

























