सोलापूर : “भाषा केवळ संवादाचे साधन नसून ती संस्कृती आणि परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवण्याचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. मराठी भाषेचा वारसा जपणे हे प्रत्येक मराठी भाषकाचे कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन प्रा. वसुंधरा कला महाविद्यालयाचे डॉ. सुहास मुरलीधर उघडे यांनी केले.
नेहरू नगर येथील श्री सुशीलकुमार शिंदे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन (मागास समाज सेवा मंडळ संचलित) येथे ‘मराठी राजभाषा गौरव दिन सप्ताह’ व कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
२८ फेब्रुवारी रोजी आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मागास समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. सुभाष चव्हाण सर व श्री. विवेक चव्हाण सर उपस्थित होते.
डॉ. सुहास उघडे : आपल्या व्याख्यानात त्यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. भाषा समृद्ध झाली तरच समाज आणि संस्कृती समृद्ध होते, असा विचार त्यांनी मांडला.
सुभाष चव्हाण (अध्यक्ष) : त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि शारीरिक शिक्षणासोबतच भाषिक कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती कलाश्री देशपांडे मॅडम यांनी केले. त्यांनी या सप्ताहाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट करून पाहुण्यांचे स्वागत केले. पाहुण्यांचा परिचय सूत्रसंचालकांनी करून दिला, तर पाहुण्यांचा सत्कार अध्यक्ष महोदयांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यशाळेस डॅा. समिना नदाफ व डॅा. लालसिंग रजपुत यानी व्याख्याते म्हनुन विद्यार्थानां मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन रेवणसिद्ध कट्टे व प्रतिमा स्वामी यांनी केले. शेवटी उपस्थित सर्वांचे आभार छात्र अध्यापक निखिल घोडके सर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी रीत्या पारपाडण्यासाठी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री. सुनिल राठोड, अनिल राठोड, केशव पाथरुट, प्रा. पुदे इत्यादी नी काम पाहीले. या सोहळ्याला महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने शारीरिक शिक्षण छात्र अध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.
























