Sunday, October 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दिवाळीच्या सुट्टीत शिक्षकांना स्वच्छतेची ड्युटी!

तरुण भारतbyतरुण भारत
October 18, 2026
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – विद्यार्थ्यांना दिवाळीची सुट्टी असली, तरी शिक्षक आणि शाळा व्यवस्थापनासमोर मात्र शाळांच्या स्वच्छतेचे नवे आव्हान उभे राहणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमध्ये ‘चला शाळेत जाऊ या’ विशेष शालेय स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता शिक्षकांची दिवाळी शाळेत जाणार असे चित्र दिसत आहे.
 १८ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दोन टप्प्यांत ही मोहीम राबविण्यात येणार असून, शाळांचा परिसर स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक पोषक बनविण्यावर भर देण्यात आला आहे. मात्र, या मोहिमेसाठी स्वतंत्र अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाणार नसल्याने उपलब्ध अनुदान आणि लोकसहभागाच्या माध्यमातूनच कामे पूर्ण करण्याचे आव्हान शाळांसमोर असेल.
शाळा म्हणजे केवळ अध्यापनाचे ठिकाण नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, शिस्त आणि सामाजिक जबाबदारीचे संस्कार मिळावेत, हा या मोहिमेमागील प्रमुख उद्देश आहे. दिवाळीच्या सुट्टीचा उपयोग करून शाळांमधील अस्वच्छता दूर करणे, आवश्यक दुरुस्त्या करणे आणि अध्ययन-अध्यापनासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर शासनाने भर दिला आहे. या उपक्रमात शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि स्थानिक समुदायाला सहभागी करून घेण्यात येणार आहे. ‘माझी शाळा, माझी जबाबदारी’ या भावनेतून शाळांच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे नियोजन आहे.
पहिला टप्पा : १८ ते २४ ऑक्टोबर २०२६.या कालावधीत शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठका घेऊन स्वच्छता मोहिमेचे नियोजन करण्यात येणार आहे. वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष, क्रीडांगण आणि पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेची पाहणी केली जाईल. शाळांमध्ये आवश्यक असलेल्या दुरुस्त्या, निरुपयोगी साहित्य आणि भंगाराची यादी तयार करून कृती आराखडा निश्चित करण्याचे निर्देश आहेत.
दुसरा टप्पा : २५ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या टप्प्यात प्रत्यक्ष स्वच्छता आणि दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत. वर्गखोल्या व स्वच्छतागृहांची स्वच्छता, पाण्याच्या टाक्यांची सफाई, कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, विद्युत उपकरणांची तपासणी आणि किरकोळ दुरुस्ती केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांनाही प्राधान्य दिले जाणार आहे.
या मोहिमेसाठी शाळांना कोणताही स्वतंत्र किंवा अतिरिक्त निधी दिला जाणार नाही, हे या निर्णयातील महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. शाळांच्या दैनंदिन गरजांसाठी समग्र शिक्षा योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या एकत्रित अनुदानातून नियमानुसार खर्च करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे शाळांनी उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करणे आणि लोकसहभागातून आवश्यक कामे पूर्ण करण्याचे नियोजन करणे अपेक्षित आहे.
मात्र, मोहिमेच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून सक्तीने किंवा अनिवार्य स्वरूपात आर्थिक वर्गणी गोळा करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे पालकांवर आर्थिक भार न टाकता स्वच्छता मोहिमेला लोकसहभागाची जोड देणे, ही शाळा व्यवस्थापनासमोरील महत्त्वाची जबाबदारी ठरणार आहे.
चौकट
शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
अध्यापनाव्यतिरिक्त विविध प्रशासकीय आणि अशैक्षणिक कामांचा बोजा शिक्षकांवर पडत असल्याची तक्रार सातत्याने केली जाते. आता दिवाळीच्या कालावधीत विशेष स्वच्छता मोहिमेचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्याची जबाबदारीही शाळांवर येणार आहे. त्यामुळे मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करताना शिक्षकांच्या अध्यापनविषयक जबाबदाऱ्या, कामाचे नियोजन आणि सुट्टीच्या कालावधीतील कामकाज यांचा समतोल राखणे आवश्यक ठरणार आहे.
चौकट
स्वच्छ शाळा, सुरक्षित विद्यार्थी हेच उद्दिष्ट
या मोहिमेचे यश केवळ शाळेच्या परिसराची साफसफाई करण्यापुरते मर्यादित राहू नये. शाळांमधील पिण्याचे स्वच्छ पाणी, वापरण्यायोग्य स्वच्छतागृहे, सुरक्षित विद्युत व्यवस्था, कचरा व्यवस्थापन आणि मूलभूत सुविधांची नियमित देखभाल यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण होणे गरजेचे आहे. ग्रामस्थ, पालक आणि माजी विद्यार्थ्यांनीही शाळांच्या सुधारणेत सहभाग घेतल्यास या उपक्रमाला व्यापक स्वरूप मिळू शकते.
चौकट
प्रत्यक्ष सुधारणा होणे महत्त्वाचे
दिवाळीच्या सुट्टीतील ही मोहीम शाळांचा चेहरामोहरा बदलण्याची संधी ठरू शकते. मात्र, त्यासाठी केवळ आदेश आणि स्वच्छतेची औपचारिकता पुरेशी नसून, उपलब्ध निधीचा नियमानुसार वापर, शिक्षकांवरील कामाचे योग्य नियोजन आणि लोकसहभागातून शाळांच्या मूलभूत सुविधांमध्ये प्रत्यक्ष सुधारणा होणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Post Views: 14
Previous Post

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार

Next Post

शैक्षणिक साहित्य पेटीत बंद; सीईओ कुशल जैन यांनी कडबगावातच उघडली पोलखोल!

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शैक्षणिक साहित्य पेटीत बंद; सीईओ कुशल जैन यांनी कडबगावातच उघडली पोलखोल!

ताज्या बातम्या

खेडगी महाविद्यालयाचा क्रिकेटमध्ये तालुकास्तरीय विजय

October 18, 2026

अत्यंत महत्त्वाच्या सोलहकारण भावना अनुशीलन ग्रंथाचे विमोचन

October 18, 2026
आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते हॉटेल मेजवानीचा बुधवारी भव्य उद्घाटन सोहळा 

आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते हॉटेल मेजवानीचा बुधवारी भव्य उद्घाटन सोहळा 

October 18, 2026

शैक्षणिक साहित्य पेटीत बंद; सीईओ कुशल जैन यांनी कडबगावातच उघडली पोलखोल!

October 18, 2026

दिवाळीच्या सुट्टीत शिक्षकांना स्वच्छतेची ड्युटी!

October 18, 2026
शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार

October 18, 2026
डॉ. कलामांचे विचार जनमानसात रुजवावेत : डॉ. नगरकर

डॉ. कलामांचे विचार जनमानसात रुजवावेत : डॉ. नगरकर

October 18, 2026
बार्शी शहरातील २१ प्रभागांमध्ये विंधन विहीर सबमर्सिबल पंप पाणी टाकी बसविण्यासाठी आमदार कोठ्यातून प्रस्तावित

बार्शी शहरातील २१ प्रभागांमध्ये विंधन विहीर सबमर्सिबल पंप पाणी टाकी बसविण्यासाठी आमदार कोठ्यातून प्रस्तावित

October 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1375380

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!