Sunday, July 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

चिमण्यांच्या संवर्धनासाठी वर्षभरात शेकडो कृत्रिम घरटे बनवून मोफत वाटप

तरुण भारतbyतरुण भारत
March 20, 2026
in editor
0
चिमण्यांच्या संवर्धनासाठी वर्षभरात शेकडो कृत्रिम घरटे बनवून मोफत वाटप
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज – अनादी काळापासून माणसाशी जवळीकता साधून असणाऱ्या मुठी एवढ्या आकाराच्या घरचिमण्या मानवी हस्तक्षेपामुळे सध्या संकटात सापडले आहेत. दिवसेंदिवस त्याची संख्या घटत चालली आहे हे सर्वांच्या निदर्शनास आले आहे. मानवी वसाहतीतील चिमण्यांची चिवचिवाट लुप्त होऊ नये, चिमण्यांची संख्या कमी होऊ नये व त्यांचे संवर्धन व्हावे या उद्देशाने येथील पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी गेली कित्येक वर्षे कृत्रिम घरटी बनवून गरजू व चिमण्यांवर प्रेम करणाऱ्यांना पुरवण्यात व्यस्त असतात. 

~~~२० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून डॉ. कुंभार वर्षभर महिन्यात सुमारे तीनशे ते चारशे कृत्रिम घरटी तयार करतात. तयार केलेल्या घरटी ज्यांना आवश्यकता असेल त्यांना मोफत देतात. बऱ्याच वेळा अशासकीय संस्था (एनजीओ) व शाळा महाविद्यालयात घरटी बनवायची कार्यशाळा आयोजित करतात. 

*कृत्रिम घरट्यासाठी वापरण्यात येणारी वस्तू*

 ~~~घरात पडलेल्या कागदी पुट्टे वा कार्डबोर्ड यांना घरट्यांचा आकार देऊन, पोकळ बांबूचे तुकडे, फ्लेक्स बोर्डचे कापड वापरून झाल्यावर राहिलेल्या पुट्ट्याच्या गुंडाळी, बॅडमिंटन शटल बाॅक्स, खाकी चिकट पट्टी व डिंक तसेच बांबूच्या सहा इंच काड्या हे टाकाऊ साहित्य वापरून डॉ. कुंभार घरटे तयार करतात. 

~~~वाढती वृक्षतोड व सिमेंटच्या वाढत्या जंगलामुळे शहरांसह ग्रामीण भागात सुद्धा चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटू लागली आहे. त्यात भर पडली आहे मोबाईलच्या उंच मनोरे व भ्रमण लहरी. या कारणांमुळे  चिमण्या मनुष्य वस्तीला रामराम ठोकून जंगलवासी होण्याला  सरसावत आहेत. मोबाईल व वाहनांच्या अतिवापरामुळे त्यांचा चिवचिवाट ऐकू येत नाही. चिमण्यांची घटत चाललेली संख्या लक्षात घेता त्यांना वाचविण्याची गरज आहे म्हणून  कृत्रिम घरटी  तयार करून  त्यांच्या संतानोत्पत्तीसाठी मानवकुल तत्परता दाखवायला पाहिजे असे डॉ. कुंभार म्हणतात. डॉ. कुंभार यांच्या  अकलूजमधील त्यांच्या निवासस्थानी भेटी देणाऱ्यांना ते चिमण्यासाठी घरटे भेट देऊन चिमणी संवर्धनाच्या  कामाला हातभार लावतात. 

चिमण्या आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून मातीच्या भांड्यात पाणी भरून ठेवावेत, घराच्या अंगणात व गच्चीवर दररोज सकाळी पसाभर धान्य पसरवून टाकवेत, कृत्रिम  घरटे आपल्या भिंतीला व पोर्चमध्ये अडकून ठेवावेत व मुलांच्या परीक्षा संपल्या की त्यांना कृत्रिम घरटी तयार करण्यास प्रवृर्त करावे असे आवाहन  डॉ. कुंभार आपल्या संवादातून करतात.

Post Views: 32
Previous Post

अधिकृत एस . टी . बस स्थानकासमोरच बसेस थांबणार

Next Post

प्रामाणिकतेचा आदर्श! सापडलेला ६५ हजारांचा मोबाईल केला परत

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
प्रामाणिकतेचा आदर्श! सापडलेला ६५ हजारांचा मोबाईल केला परत

प्रामाणिकतेचा आदर्श! सापडलेला ६५ हजारांचा मोबाईल केला परत

ताज्या बातम्या

महापौरांनीच हाकलुन लावले #marathinews #viral #maharashtranews

July 5, 2026
प्रभारी डी.डी.आर.पदी उमेश पवार यांच्याकडे सूत्रे 

प्रभारी डी.डी.आर.पदी उमेश पवार यांच्याकडे सूत्रे 

July 4, 2026

पाणीटंचाईवर ग्रामपंचायतींचा फोकस; विहिरींच्या खोलीकरणाला वेग

July 4, 2026

शाळांच्या वीजबिलांचा भार ग्रामनिधीतून व्हावा ; शिक्षक सहकार संघटनेचे सीईओंना निवेदन 

July 4, 2026

​शारीरिक शिक्षण शिक्षकांचे ८ जुलैपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन

July 4, 2026
फरहान बागवान, यस्मिता लीला सोलापूर जिल्हा बास्केटबॉल कर्णधार

फरहान बागवान, यस्मिता लीला सोलापूर जिल्हा बास्केटबॉल कर्णधार

July 4, 2026

सर मोहिमेसाठी बी. एल.ओ.शिक्षकांना पूर्णवेळ नियुक्ती; इतर कामांपासून मुक्त ठेवण्याचे सी. ई.ओंचे आदेश

July 4, 2026

पैठण कारागृहातून पळालेल्या कैद्याला बार्शीत अटक

July 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0959188

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!