सोलापूर : परमपूज्य महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानची वार्षिक नियोजन बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. हे पूजन उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाले.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महादेव मामा बाबरे, प्रा. सिद्धार्थ जाधव, संस्थापक अजित गादेकर, अमोल दादा वामणे, पवन थोरात, चंदन निंबर्गीकर, शहाबाज बागवान, अल्ताफ भाय शेख, अतिश शिरसट, प्रबुद्ध कुमार दोड्यानूर, प्रेम बिडबाग, सुजित शेंडगे, किरण मस्के, कपिल सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळात सलोखा व ऐक्य कायम राहावे, या उद्देशाने नूतन उत्सव अध्यक्षांचा सन्मान सोहळा पार पडला. त्यानंतर बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
यामध्ये अध्यक्षपदी सुहास साबळे यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी रितेश इंगळे, प्रथम कांबळे, राजन जेटीथोर व भुवन गायकवाड यांची निवड झाली. खजिनदार म्हणून जीवक हजारे, ऋषिकेश सोनकांबळे व आदित्य चंदनशिवे यांची जबाबदारी देण्यात आली. सेक्रेटरीपदी सुनील शिवशरण, आप्पा कांबळे व राजू शेख, तर सह सेक्रेटरीपदी अजय प्रक्षाळे व बाळू साबळे यांची निवड झाली. सोशल मीडिया प्रमुख म्हणून रोहन चिताटे व बबलू शेख, तर मिरवणूक प्रमुख म्हणून गजानन होटकर, सचिन कांबळे व प्रशांत गायकवाड यांची निवड करण्यात आली.ही बैठक यशस्वी करण्यासाठी संयोजक संजय बनसोडे, प्रमोद चंदनशिवे, अमोल सोनवणे, शांतकुमार साबळे, मल्लिनाथ रामशेट्टी, अमोल शिंदे, विजय गादेकर, आकाश गंटोल, मल्लेश घागरे यांच्यासह सर्व सभासद व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव भव्य, दिव्य आणि उत्साहात साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला.























