सोलापूर – वीज क्षेत्रात कार्यरत असलेल्या समाज बांधवांच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेत निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोलापूर येथील गोपाबाई दमानी ब्लड बँकेच्या सभागृहात नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरण कंपनीचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता मारुती फंड होते.
कार्यक्रमाचे आयोजन विलास कोले, मोहन पाटील, बालाजी चौरे, विजय अडसूळ,
बाबा पाटील, अक्षय देशमुख त्रिपद शिंदे आणि सहकाऱ्यांनी केले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेवक अमोल शिंदे, जयकुमार माने, विनोद भोसले, प्रियदर्शन साठे, मनोरमा सपाटे, श्रद्धा पवार, मृण्मयी गवळी, वैशाली चालुक्य आणि कल्पना कदम यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
” आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो आणि समाजाभिमुख कामातून आम्ही समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही सर्व सत्कारमूर्ती निश्चितपणे प्रयत्न करू आणि भविष्यात समाज बांधवांना कोणतीही अडचण असेल तर आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी नक्की उभा राहू, ” असे सत्काराला उत्तर देताना अमोल शिंदे यांनी सांगितले.
श्री शिंदे यांच्या बरोबरच कार्यक्रमाला उपस्थित सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांनी समाजाने केलेल्या या सत्काराबद्दल ऋण व्यक्त करून संयोजकांना धन्यवाद दिले.
या नवनिर्वाच नगरसेवकांबरोबरच महावितरण पारेषणचे कार्यकारी अभियंता एन टी चव्हाण, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता शरावती लामकाने, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप कदम, वर्कर्स फेडरेशनचे राज्य उपसरचिटणीस विलास कोले, शंभूराजे युवा संघटनचे नितीन चव्हाण, बार असोसिएशनचे बाबा माने, मोहन पाटील, मोहन अलाट, बाळासाहेब सुरवसे आदी मान्यवरांचा पण सन्मान करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी चौरे, विजय अडसूळ, अक्षय देशमुख, सोमा पाटील, विकास वाळके, हरीश निकम, महादेव चव्हाण, तानाजी शिंदे, संतोष जाधव, सुभाष मोरे,अण्णा पवार, आनंद चौगुले, श्रीमती शोभा जाधव, पिंकू बुरटे मॅडम आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास कोले यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विजय अडसूळ यांनी केले.


















