टेंभुर्णी : ग्रामदैवत श्री मारुती देवाच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर टेंभुर्णीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून यात्रेच्या नियोजनासाठी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत २०२६ सालच्या श्री मारुती देवस्थान यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी सोमनाथ धनाजी देशमुख तर उपाध्यक्षपदी सुरज देशमुख यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
श्री मारुती देवस्थान यात्रा कमिटी, टेंभुर्णी (२०२६)
अध्यक्ष – सोमनाथ धनाजी देशमुख
उपाध्यक्ष – सुरज बाळासाहेब देशमुख, ज्योतीराम पाटील, ऋतुराज संतोष देशमुख
खजिनदार – अविनाश शशिकांत देशमुख
सचिव – सुरेश नारायण देशमुख
मिरवणूक व उत्सव व्यवस्थापन कमिटी
मिरवणूक प्रमुख – रणजीत आटकळे
उपप्रमुख – ऋतुराज संतोष देशमुखसोमवारी (दि. २३ मार्च) मा. कल्याणराव पाटील यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीस श्री मारुती देवस्थान ट्रस्टचे चेअरमन डी. के. देशमुख, कल्याणराव पाटील, औदुंबरभाऊ देशमुख (महाडीक), किसनबापू देशमुख, सुधीरदादा पाटील, गोरखबप्पा देशमुख, सिद्धेश्वरकाका देशमुख, विजयभैय्या देशमुख, राहुल देशमुख व किशोर अण्णा देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत मान्यवरांनी यात्रेचे नियोजन पारंपरिक पद्धतीने, शिस्तबद्ध आणि अधिक आकर्षक स्वरूपात करण्याबाबत सूचना दिल्या. विशेषतः ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग, मिरवणुकीचे सुयोग्य नियोजन, तसेच धार्मिक कार्यक्रमांची सुसूत्र अंमलबजावणी यावर भर देण्यात आला.
नवीन पदाधिकाऱ्यांची निवड होताच ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी नूतन अध्यक्ष सोमनाथ देशमुख व उपाध्यक्ष सुरज देशमुख यांनी सर्व ज्येष्ठांचे आभार मानत, “मारुती रायाची यात्रा अधिक भव्य, शिस्तबद्ध आणि परंपरेला साजेशी साजरी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू,” असा विश्वास व्यक्त केला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेदरम्यान धार्मिक विधी, भजन-कीर्तन, पालखी सोहळा व आकर्षक मिरवणूक आयोजित करण्यात येणार असून लवकरच सविस्तर कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. टेंभुर्णीतील मारुती यात्रेला मोठे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असून यंदाची यात्रा नव्या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली अधिक उत्साहात पार पडणार, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


























