जेऊर – येथे श्री स्वामी समर्थ भक्तांचे जेऊर नगरीमध्ये दत्त ग्रुप मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले , श्री शेत्र मिरजगाव ते श्री शेत्र अक्कलकोट येथे पायी वारी करत जाणाऱ्या भाविकांसाठी जेऊर मधील दत्त ग्रुप मित्र मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे अतिशय आनंदी वातावरणत सहर्ष स्वागत करण्यात आले आहे.
दुपारी महादेव मंदिरात मंजुळे बंधूंनी वारकरी बंधू भगिनींना जेवण दिले ,त्यानंतर. तिथुन प्रस्थान झाले नंतर दत्त ग्रुप च्या सर्व सदस्यांनी तीव्र उन्हाच्या झळा लागत असल्यामुळे. दत्त ग्रुपच्या वतीने सर्व वारकरी भाविकांना एकुण दोनशे सांप्रदायिक भाविकांना करमाळा टेंभुर्णी रोड वरती नैसर्गिक ऊसाचा रस देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित दत्त ग्रुप चे सदस्य शशिकांत मोहिते,ऋषभ मंडलेचा, श्रीराम जाधव,आबासाहेब झिंजाडे, यांनी वारकरी भाविकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




















