सोलापूर – महाराष्ट्र केसरी सारख्या स्पर्धामुळे महिला कुस्तीला नवीन ओळख मिळत आहे.स्पर्धा सोलापुरात होत असल्याचा मोठा आनंद आहे. पारंपारिक खेळ जोपासण्याबरोबरच आपल्या मातीचा सुद्धा मान वाढवूया. कुस्तीमुळे शिस्त आणि जिद्द वाढते. कुस्तीमध्ये अनेक डावपेच असतात. कुस्ती आपल्या शरीराला ताकद देते शिवाय ऊर्जाही देते. कुस्तीमुळे आपल्या संस्कृतीचे दर्शन घडते. कुस्तीमुळे आरोग्य आणि फिटनेस सुधारण्यास मदत होते ,असे प्रतिपादन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
निर्झरा केअर फाउंडेशनच्यावतीने संस्थापिका स्वाती अळळीमोरे -साखरे यांनी आयोजित केलेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला शनिवारी सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते हनुमानाच्या मूर्तीचे पूजन करून व दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सोलापुरात महिला कुस्ती स्पर्धा होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच खेळाडूंच्या मदतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगितले. देशात सर्वच क्षेत्रांमध्ये आज महिलांनी आपला झेंडा फडकवलेला आहे. कुस्ती क्षेत्रात सुद्धा आता महिला मागे राहिलेल्या नाहीत. महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील कुस्ती प्रेमींनी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावरील आखाड्यात यावे ,असे आवाहनही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी महापौर विनायक कोंड्याल,आमदार देवेंद्र कोठे,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार,हिंद केसरी योगेश दोडके,कृषी सभापती रामप्पा चिवडशेट्टी, झेडपी सदस्य नेताजी खंडागळे,महाराष्ट्र केसरी बापूसाहेब लोखंडे सातारा, जिल्हाध्यक्ष कुस्ती सम्राट असलम काझी, महाराष्ट्र केसरी मुन्नालाल शेख बोरामणी, उपमहाराष्ट्र केसरी भरत मेकाले, मौला शेख, महाभारत केसरी केसरी योगेश बोंबाळे, पुणे केसरी समीर कोळेकर, उमेश सूळ, कुस्ती निवेदक यु्वराज केचे यांच्यासह आयोजक स्वाती अळळीमोरे साखरे, उद्योजक सागर कत्ते,नगरसेवक गणेश वानकर,सुधीर थोबडे, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते,नगरसेवक विनोद भोसले, नागेश खरात, डॉ. शैलेश पाटील वानकर, पंच प्रमुख दिनेश गुंड, किसन मेकाले, भीमराव बाळगे, सोमनाथ पटणे, केदार विभुते,सोमनाथ अळळीमोरे,bसुधा अळळीमोरे,मोहन पाटील यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले.
==================
वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ स्पर्धेचे आयोजन
वडील सिद्धाराम साखरे हे स्वतः ज्येष्ठ कुस्तीपटू, पोलीस अधिकारी व समाजसेवक होते. त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ निर्झरा केअर फाऊंडेशनची २०२३मध्ये स्थापना केली. “सोलापूर जिल्ह्यामध्ये कुस्तीसाठी चांगले नैपुण्य आहे. मात्र अव्वल दर्जाच्या सुविधा, आखाडे व स्पर्धांचे व्यासपीठ अभावी या खेळाडूंना अपेक्षेइतके आंतरराष्ट्रीय दर्जाचे करिअर करता येत नाही, हे लक्षात घेऊनच आम्ही निर्झरा फाऊंडेशनतर्फे कुस्तीगिरांच्या विकासासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही ही महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेत आहोत.”असे निर्झरा केअर फाऊंडेशनच्या संचालिका आणि संस्थापक स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी सांगितले.

















