वेळापूर – तालुका माळशिरस येथे सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कै सूर्यकांतदादा माने देशमुख यांची १९ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
प्रारंभी कै सूर्यकांतदादा माने देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आशिष कांबळे व नूतन जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले तसेच कै सूर्यकांतदादा माने देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुरू करण्यात आलेल्या पाणपोई चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आशिष कांबळे चंद्रकांत जाधव व यशस्वी महिला व्यवसायिक श्रीमती अश्विनी दादासो माने या सर्वांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी कै सूर्यकांतदादा माने देशमुख यांच्या आठवणींचा व केलेल्या कामाचा अनेकांनी उजाळा दिला.
या कार्यक्रमाला महादेव देवालय ट्रस्टचे अध्यक्ष अमृतराज माने देशमुख, सोसायटी चेअरमन अमरसिंह माने देशमुख ,माजी जि प सदस्य बाळासाहेब धाईंजे, आनंदराव माने देशमुख, बाळासाहेब माने देशमुख, सुभाष जगताप, जयराज माने पाटील, विरकुमार दोशी, बप्पा पाटील, दत्तात्रय माने ,गोपाळ घाडगे, संदीप माने देशमुख, पिनू एडगे, मेजर निशिकांत शिंदे , पांडुरंग घाडगे, पांडुरंग पनासे, उमेश भाकरे, सुनील गायकवाड, शैलेश भाकरे, विष्णुपंत पिसे, विश्वास वाघे, प्रशांत धोत्रे, श्रीधर देशपांडे, प्रवीण चव्हाण, अशोक साबळे, हरी मेटकरी, श्रीकृष्ण देशपांडे, गिरीश कुलकर्णी, सुदाम अंबुरे, ओंकार खराडे, सचिव दीपक माळवदकर ,क्लार्क शिवाजी आडत, विजय मिरगे, अशपाक मुलानी, धैर्यशील माने देशमुख, शंकरराव माने देशमुख, राहुल माने देशमुख, शरद साठे, राजकुमार बनसोडे, मेजर हिम्मतराव माने देशमुख, विश्वजीत माने देशमुख, सूर्यकांत भाकरे, सचिन भाकरे, दादासाहेब भाकरे, अनंत क्षीरसागर, वसंत क्षीरसागर, निखिल शिंदे, दत्तात्रेय माळी, महेश साठे, उत्तम साठे, शिवाजी माने देशमुख, संतोष माने देशमुख, मोहन काशीद, श्रीनिवास कदम पाटील,तसेच सोसायटीचे संचालक सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.
—————————————————————
फोटो ओळी
वेळापूर येथे कै सूर्यकांतदादा माने देशमुख यांची पुण्यतिथी साजरी कलण्यात आली . यावेळी पोलीस स्टेनचे सपोनि अशिष कांबळे, चंद्रकांत जाधव, व मान्यवर, ग्रामस्थ यावेळीउपस्थित होते.


















