सांगोला – श्रीराम प्रतिष्ठान व सकल हिंदू समाज बांधव सांगोला तालुका यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीराम नवमी निमित्त शुक्रवार दि.२७ मार्च रोजी शोभायात्रेचे आयोजन केले होते.
सदर शोभा यात्रेमध्ये प्रभू श्रीरामांची भव्य मूर्ती, छत्रपती संभाजी महाराज व बजरंगबली यांची भव्य अशी १२ फूट मूर्ती यांचे खास आकर्षण होते. तसेच इचलकरंजीचे भव्य लाईट शो आणि साउंड शो याच्याकडे नागरिकांचे लक्ष वेधले होते.
याप्रसंगी जय श्रीराम या घोषणेने वातावरण भक्तीमय झाले होते. सर्व श्रीराम भक्तांनी ही मिरवणुक पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.
















