सोलापूर – येथील रेल्वे मैदानावर सुरू असलेल्या ‘इंडियन मॉडेल पेरेंट्स क्रिकेट लीग’ पर्व १६वे मध्ये शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यांत ‘आयएमएस शिवशंभो’ आणि ‘आयएमएस ग्लोबल वॉरियर्स’ या संघांनी शानदार विजय नोंदवले.
पहिल्या सामन्यात शिवशंभो संघाने अल्फा संघावर ५ गडी राखून विजय मिळविला. महादेव वरळे (३-१३) सामनावीर ठरला. दुसऱ्या सामन्यात ग्लोबल वॉरियर्सने माऊली मास्टर्स ३३ धावांनी मात केली.
इस्माईल पिरजादे (३४ धावा व २/६) सामन्याचा मानकरी ठरला.
संक्षिप्त धावफलक : अल्फा: १० षटकांत सर्वबाद ७३ धावा. (मुकद्दर शेख ११, मोहसिन शेख नाबाद ११, महादेव वरळे ३/१३, श्रीकांत कुरापाटी २/५) पराभूत विरुध्द शिवशंभो: ५ षटकांत ७७ धावा. (अनिरुद्ध एक्कलदेवी नाबाद १६, राकेश उदिगिरी नाबाद १६, अंबाजी कडरा ११. अनिल जाधव २/११).
ग्लोबल वॉरियर्स: ११ षटकांत सर्वबाद ९२ धावा. (इस्माईल पिरजादे ३४, सुनील कडरे २३. जयराज मडोळे ३/१३) वि. विरुद्ध माऊली मास्टर्स: १० षटकांत सर्वबाद ५९ धावा. (अतुल परदेशी नाबाद १४, जावेद नाईकवाडी १०, इस्माईल पिरजादे २/६, मल्लिकार्जुन आवटे २/११, राजेश शर्मा २/७, मुकुंद वाघमारे २/१८).


















