बिलोली – शहरात विश्व् हिंदू परिषद, बजरंगदल बिलोली प्रखंड यांच्या वतीने दि ४ एप्रिल रोजी शनिवारी श्रीराम जन्मोत्सवा निमित्त हिंन्दू महागर्जना रॅली व विशाल धर्मसभेचे आयोजनकरण्यात आले आहे. या धर्मसभेला हिंदुत्वाची बुलंद तोफ तेलंगणाचे आमदार टि. राजासिंह हे संबोधित करणार आहेत यामुळे तालुक्यातील सर्व हिंदू बांधव व भगिणींनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहण्याचे आव्हान दि.२८ मार्च रोजी शासकीय निवास्थान येथे झालेल्या पत्रकार परिषदे दरम्यान विश्व् हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने करण्यात आले आहे.
श्रीराम जन्म मोत्सवा निमित्त शहरात विश्व् हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने पंधरा वर्षाची परंपरा कायम राखत यावर्षीही दि. ४ मार्च रोजी हिंदू महागर्जना रॅली व धर्मसभेच आयोजन कारण्यात आले आहे. या धर्मसभा आर्शीवचन महृणुन नांदेड जिल्ह्यातील श्री शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर, श्री.सदगुरु नराशाम महाराज येवतीकर, श्री.महंत नामदेव महाराज उमरजकर, श्री वेंकटेशाचार्य महाराज जिअर स्वामी’ मंदीर गाडीपुरा नाबेड, डॉं विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड, या सर्म संत महंताचे आर्शिवचन होणार आाहे. शोभायात्रा प्रारंभे बागेतील हनुमान मंदीर येथून दुपारी ठिक २ वाजता सुरुवात होईल. तद्नंतर जनावरांचा आठवडी बाजार देगलूर रोड येथे सायंकाळी ६ वाजता धर्मसभा होणर आहे.
या प्रसंगी विशेषत्वाने सनातन हिंदू धर्मास उभारी देणारे मठ मंदिर पुजारी, भंजनी मंडळी यांचा सत्कार आयोजीत केलेला आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील सर्व मंठ मंदीर पुजारीं व हिंदू बांधवानी जास्ती जास्त संख्येने उपस्थित रहावं, असे आव्हान विश्व् हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदे दरम्यान करण्यात आहे.
यावेळी गजानन पांचाळ प्रांत संयोजक, महेश कुलकर्णी तालुकाध्यक्ष, ऋषिकेश गोगरोड, महेश ठकरोड, अविनाश डोपोड, मारोती जाधव, दुर्गेश फालके, पवनगीरी, कैलास बंडगर, तेजेश चौधरी, शिवशंकर देशमुख, आकाश ठक्करोड, किरण चौधरी यांची उपस्थिती होती.

















