लोहा – भारतीय जनता पार्टी सोशल मिडिया लोहा शहर मंडळ संयोजक पदी केशव पाटील पाटील यांची निवड जाहीर केली आहे.
लोहा भाजपाचे कट्टर समर्थक तरुण तडफदार पत्रकार केशव पाटील पवार यांची सामाजिक, राजकीय व मिडिया क्षेत्रात सदा अग्रेसर असलेले पवार लोहा न.प. च्या निवडणुकीत भाजपाच्या प्रचारात अग्रेसर राहुन प्रमुख भूमिका बजावनारे भाजपाचे कट्टर समर्थक तरुण तडफदार पत्रकार केशव पाटील पवार यांच्या कार्याची दखल भाजपा पक्ष श्रेष्ठींनी घेऊन त्यांच्यावर भाजपाच्या लोहा सोशल मिडिया संयोजकपदी निवड केली आहे.
सदरील निवडीचे पत्र भाजपाचे सोशल मिडिया जिल्हा संयोजक संजीव पांचाळ शहापूरकर यांनी केशव पाटील पवार यांना दिले आहे.
लोहा येथील पत्रकार केशव पाटील पवार यांची भाजपा लोहा शहर मंडळ सोशल मिडिया संयोजक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन भाजपाचे लोहा शहर मंडळ अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, भाजपाचे लोहा शहर मंडळ उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक बबनराव निर्मले, भाजप जिल्हा सांस्कृतिक विभाग संयोजक तथा शहर मंडळ उपाध्यक्ष, पथ विक्रेता समिती सदस्य नगर परिषदेचे डी.एन.कांबळे, सचिन सावकार सुर्यवंशी, मिलिंद पाटील पवार, संदिप दमकोंडवार, बाळासाहेब कतुरे , पांडुरंग रहाटकर आदीने केले आहे.
















