जेऊर – प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सोलापूर ग्रामीण पोलीस दलात निवड झाल्याबद्दल निंभोरे येथील ज्ञानेश्वरी काळदातेचा निंभोरे ग्रामस्थ व योद्धा कारिअर अकॅडमीच्या वतीने मकाई कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला
निंभोरे तालुका करमाळा येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलीची जिद्द कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर सोलापूर पोलीस दलात निवड झाली आहे. आई-वडिलांची बेताची परिस्थिती असताना बारावीनंतर पुढील शिक्षण घेणे शक्य नसल्याने स्वतःच्या पायावर उभे राहून नोकरी मिळवावी या हेतूने पोलीस भरतीचा सराव सुरू केला सोलापूर ग्रामीण पोलीस दलात भरती निघाल्यानंतर काही दिवस जेऊरवाडी येथील योद्धा करिअर अकॅडमीचे नवनाथ नाईकनवरे व इतर सहकाऱ्यांनी तिला योग्य मार्गदर्शन केल्याने पहिल्याच प्रयत्नात चांगल्या गुण मिळवत तिची सोलापूर ग्रामीण पोलीस दलात निवड झाली आहे गावच्या मुलीने संघर्षातून मिळवलेल्या या यशाबद्दल निंभोरे ग्रामस्थांच्या वतीने तिचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना दिग्विजय बागल यांनी यावेळी बोलताना करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलांमध्ये जिद्दीने कष्ट करण्याची तयारी आहे त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे ती गरज योद्धा अकॅडमीच्या माध्यमातून पूर्ण झाल्याने ज्ञानेश्वरी मिळवलेले यश तालुक्यातील इतर मुलींसाठी निश्चितच प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निंभोरे ग्रामपंचायतचे सरपंच रवींद्र वळेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलिस निरीक्षक स्वप्निल लोंढे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनाथ नाईकनवरे यांनी केले सुरुवातीला ग्रामस्थांच्या वतीने तिचा सन्मान करण्यात आला याबरोबरच योद्धा अकॅडमी मधील ॠतूराज शिर्के या विद्यार्थ्यांचीही महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
यावेळी सरपंच रवींद्र वळेकर पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल लोंढे, राजेश वरकड यांनी आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमाला आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक अविनाश वळेकर योद्धा अकॅडमी चे अध्यक्ष हंबीरराव नाईकनवरे यांच्यासह नागनाथ काळदाते ज्ञानेश्वर वाघमारे अमोल काळदाते निशा अनपट सोनाली नाईकनवरे त्यांच्यासह निंभोरे ग्रामस्थ व अकॅडमी मधील विद्यार्थी व संख्येने उपस्थित होते


















