बार्शी – पुणे तिथं काय उणे या युक्ती प्रमाणे पुणेकर काय नवीन शोध लावतील याचा नेम नसतो ,अशाच नवीन युक्ती प्रमाणे ‘उत्कृष्ठ प्रेक्षक’ म्हणून नादब्रम्हां म्युझिकल संस्थेने सुरु केला आहे
पुण्यातील अग्रगण्य संगीत क्षेत्रातील नादब्रम्हा म्युझिकल्स या संस्थेकडून ‘उत्कृष्ठ प्रेक्षक’ म्हणून बार्शीचे छंदिष्ट गायक कलाकार सुनिल फल्ले यांची निवड केली होती. सदर पुरस्कार संस्थापक अध्यक्षा सौ. स्वाती पटवर्धन, त्यांचे पती राजेश पटवर्धन आणि ज्येष्ठ सदस्य सुनिल कुमार यांचे हस्ते प्रदान केला. सदर कार्यक्रम शुक्रवार दि. ३ एप्रिल रोजी पत्रकार भवन, पुणे येथे पार पडला. निमित्त होते संस्थापक अध्यक्षा सौ स्वाती पटवर्धन यांचा वाढदिवस. यावेळी पीएसआय आनंद काळूजकर, सौ. अपर्णा काळूजकर, अशोकराव गायकवाड, सौ. अश्विनी वडके, हरीश शरणागत, सौ. जयश्री सिंकलकर, सौ. वासंती वायचळ, सौ. गीता कोसंदकर, आनंद गायकवाड, उमेश भागवत, विनोद धीवार, शकीलभाई काजी, बाळकृष्ण दोरगे, सौ. वासंती वाटखाडे, सौ. कावेरी देशमुख तसेच नादब्रम्हांचे सर्व सदस्य, गायक कलाकार उपस्थित होते.
उत्कृष्ठ प्रेक्षक पुरस्कार प्राप्त झालेबद्दल बार्शीतील वृक्ष संवर्धन समिती, ओन्ली समाज सेवा बहुउद्देशीय संस्था, प्रसन्नदाता मंडळ, फक्त हौशी कलाकार ग्रुप, डिजीटल मीडिया बार्शी, व्हॉईस ऑफ मीडिया बार्शी, पत्रकार संघ बार्शी, वीरशैव लिंगायत तेली समाज, जाणीव फाउंडेशन, बार्शी अकाउंटट असोसिएशन,राधा कृष्ण सेवा मंडळ, हेल्थ क्लब, शिवराय प्रतिष्ठाण, वृत्तपत्र विक्रेता संघ आदी संस्थांनी अभिनंदन केले.
















