Thursday, July 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक संघटनेच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘नारीशक्ती सन्मान सोहळा’ 

तरुण भारतbyतरुण भारत
April 5, 2026
in editor
0
अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक संघटनेच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘नारीशक्ती सन्मान सोहळा’ 
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जनसामान्यांचे प्रश्न मांडणाऱ्या अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा ५ वा वर्धापन दिन आणि ‘नारी शक्ती सन्मान सोहळा’ बार्शी येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दीप प्रज्वलन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला.

देशपांडे व्हेज हॉल येथे आयोजित या सोहळ्याचे अध्यक्षपद संघटनेचे संस्थापक तथा केंद्रीय अध्यक्ष राजा माने यांनी भूषविले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. आ. राजेंद्र राऊत, सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, तहसीलदार एफ. आर. शेख, नगराध्यक्षा सौ. तेजस्विनी कथले, पंचायत समिती सभापती सौ. मीनाक्षी रोंगे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विजय गरड, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, माजी उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रीय संघटक तेजस राऊत, प्रतिबिंब प्रतिष्ठानचे सचिव दिपक नलावडे, राष्ट्रीय समन्वयक मुरलीधर चव्हाण, राज्य कोषाध्यक्ष अमित इंगोले, राज्य कार्यकारिणी सदस्य सूर्यकांत वायकर, संतोष सूर्यवंशी, राज्य सल्लागार मयूर गलांडे, प्रसिद्धी प्रमुख धिरज शेळके, जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी, जिल्हा सहसचिव दिनेश मेटकरी, माजी नगरसेवक प्रशांत कथले, दीपक रोंगे, प्रशांत कटारे, पंढरपूर शहर उपाध्यक्ष अजित देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी समाजातील विविध क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या जिल्ह्यातील ६ महिलांचा मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्काराने गौरव करण्यात आला. यामध्ये ​सौ. अनु प्रसाद मोहिते- जीवन गौरव सन्मान, ​ह.भ.प. शिवलीलाताई पाटील- कीर्तन रत्न सन्मान, ​सौ. मनिषा भगवान लोकरे- क्रीडा रत्न सन्मान, ​सौ. सायरा नुह मुल्ला- समाज रत्न सन्मान, ​सौ. सारीका गिरीश संघवी- मातृत्व गौरव सन्मान, ​श्रीमती मनिषा मुकुंद गुरव- आदर्श महिला वाहक सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. 

​​या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे बार्शी तालुक्याचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांची प्रकट मुलाखत राज्यभर चर्चेचा विषय ठरली. ज्येष्ठ संपादक राजा माने, एबीपी माझाचे पत्रकार मयुर गलांडे, आणि महिला जिल्हाध्यक्षा निता देव यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना राऊत यांनी बार्शीच्या विकासावर आणि राजकीय प्रवासावर सविस्तर भाष्य केले. राजेंद्र राऊत यांच्या जीवनामधील वर्गातील मॉनेंटरपासून विधानसभा सदस्य व लोकनेते बनन्यापर्यंतच्या प्रवासातील अनेक गोष्टींना उजाळा दिला. 

​संघटनेचे संस्थापक तथा केंद्रीय अध्यक्ष राजा माने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, गेल्या ५ वर्षात ७ राज्यांमध्ये संघटनेने आपल्या कामाचा विस्तार केला असून, डिजिटल मीडियाच्या माध्यमातून जनसामान्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही सातत्याने करत आहोत. संघटनेमध्ये राज्यातील १३ हजार पत्रकार सदस्य असून, आतापर्यंत संघटनेच्या अंतर्गत प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी व पाल्यांच्या शैक्षणासाठी तब्बल १७ लक्ष रुपये निधी वितरित करण्यात आल्याचेही यावेळी राजा माने यांनी सांगितले. याप्रसंगी तहसीलदार एफ. आर. शेख, पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे भाऊसाहेब आंधळकर, कृष्णराज बारबोले आदींनी आपले मनोगत व्यक्त करत संघटनेच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये प्रसिद्धी धिरज शेळके यांनी संघटनेच्या कार्याचा व विस्ताराचा आढावा सांगितला. तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बसवंत यांनी ४ मे रोजी कला अकादमी पणजी, गोवा येथे संघटनेचे तिसरे राष्ट्रीय महाअधिवेशन दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार असल्याचे म्हटले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निता देव यांनी केले तर उपस्थितांचे आभार भैरवनाथ चौधरी यांनी मानले. याप्रसंगी विश्वगुरु माऊली मुलींची वारकरी शिक्षण संस्थेतील ५० मुलींनी संप्रदायिक पद्धतीने टाळाच्या गजरामध्ये पाऊल खेळत पाहुण्यांचे स्वागत केले. सुप्रसिद्ध सनई वादक राऊत बंधूनी सनई चौघाडाच्या वादनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. तर माऊली भिसे यांच्या संबळ वादनाने कार्यक्रमाची आणखीनच शोभा वाढली. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अजय पाटील, महिला जिल्हाध्यक्ष निता देव, बार्शी तालुका अध्यक्ष सिद्धार्थ बसवंत, शंकर लाखे, अक्षय बारंगुळे, रवींद्र सांगोळे, विशाल मोरे, विश्वास वीर, श्रीशैल माळी, भैरवनाथ चौधरी, दत्ता सुरवसे, किशोर शेटे, कदीर बागवान, सुनील अवघडे, दत्ता गुरव, गोविंद भिसे, उमेश नायकुडे, राहुल भालशंकर, किरण माने, वैशाली ढगे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला बार्शी तालुक्यातील पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर व बार्शीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 32
Previous Post

आटपाडी-नाझरे-सांगोला-गाणगापूर बसफेरी उद्यापासून सुरू 

Next Post

‘उत्कृष्ठ प्रेक्षक’  म्हणून  पुणे येथे सुनिल फल्ले यांचा सन्मान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
‘उत्कृष्ठ प्रेक्षक’  म्हणून  पुणे येथे सुनिल फल्ले यांचा सन्मान

'उत्कृष्ठ प्रेक्षक'  म्हणून  पुणे येथे सुनिल फल्ले यांचा सन्मान

ताज्या बातम्या

जिल्हा क्रिकेट असोसिएशन जालनाच्या ९ खेळाडूंची महाराष्ट्राच्या संभाव्य संघात निवड; जिल्ह्यासाठी अभिमानाची कामगिरी

जिल्हा क्रिकेट असोसिएशन जालनाच्या ९ खेळाडूंची महाराष्ट्राच्या संभाव्य संघात निवड; जिल्ह्यासाठी अभिमानाची कामगिरी

July 15, 2026

दीर्घकाळ विनापरवानगी गैरहजर सहा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती 

July 15, 2026
राज्यातील ३ जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना उपसंचालकपदी  पदोन्नती

राज्यातील ३ जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना उपसंचालकपदी  पदोन्नती

July 15, 2026
आदर्श पब्लिक स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा! गुणवंतांचा जंगी सत्कार; सुमेध हिवराळे ठरला संस्थेचा पहिला ‘आयआयटीयन’

आदर्श पब्लिक स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा! गुणवंतांचा जंगी सत्कार; सुमेध हिवराळे ठरला संस्थेचा पहिला ‘आयआयटीयन’

July 15, 2026
अकलूजच्या  विकासासाठी तब्बल ५३९ कोटींचा ऐतिहासिक निधी मंजूर!

अकलूजच्या  विकासासाठी तब्बल ५३९ कोटींचा ऐतिहासिक निधी मंजूर!

July 15, 2026
गोवा विद्यापीठातून डॉ. आर्या शेटे यांना   बीएएमएसची पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त

गोवा विद्यापीठातून डॉ. आर्या शेटे यांना   बीएएमएसची पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त

July 15, 2026
करकंब येथे श्री.चौंडेश्वरी भावई मिरवणूक उत्साहात साजरी

करकंब येथे श्री.चौंडेश्वरी भावई मिरवणूक उत्साहात साजरी

July 15, 2026
राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेत ज.रा. चंडक प्रशालेच्या संकेत लिगाडेला कांस्य पदक

राष्ट्रीय डायव्हिंग स्पर्धेत ज.रा. चंडक प्रशालेच्या संकेत लिगाडेला कांस्य पदक

July 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0978352

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!