वळसंग – येथील श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती कार्यक्रम संपन्न झाला.सर्वप्रथम प्राचार्य वीरेश थळंगे व पर्यवेक्षक शिवानंद घोडके यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी संजयकुमार धनशेटृटी ,सिदधाराम भैरामडगी , बाळकृष्ण गुंड, निलकंठ कवटगी, श्रीमंत भोसले,प्रा.संतोष शिंदे, बसवराज दुधगी,वीरेश थळंगे,सिध्दारूढ हिरेमठ, गंगाधर बिराजदार, संतोष कस्तुरे, विजय प्याटी, शिवराज अष्टगी,मल्लिनाथ गौडगाव,प्रा.शरणय्या मसुती , विजयालक्ष्मी थळंगे, शैला निंबाळ, गंगा बागलकोटी, स्नेहा हळगोदे,प्रा.प्रतिभा ताडुंरे वरिष्ठ लिपिका राजश्री दुधगी, कनिष्ठ लिपिक गौरीशंकर चनशेट्टी, सेवक कट्टेप्पा कोळी , सुनिता कुर्ले आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख तानाजी जमादार यांनी केले.























