सोलापूर : महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती तसेच एस. एस. फाउंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त “महामानव चषक” क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन अधिकारी टिळकचंद कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी एस. एस. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेषराव शिरसठ, जयंती उत्सव अध्यक्ष बाळासाहेब गोतसुर्वे , प्राणी संग्रहालय प्रमुख डॉ. चौगुले , उद्यान अधीक्षक स्वप्नील सोलनकर, अनिल जगझाप, लिंबराज जेठीथोर, सतीश नागटिळक यांच्यासह सोलापूर महानगरपालिकेतील अनेक क्रीडाप्रेमी अधिकारी-कर्मचारी व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करून क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून एकात्मता, बंधुता आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्याचे आवाहन केले. “महामानव चषक” स्पर्धेमुळे कर्मचारी वर्गामध्ये क्रीडाप्रेम वाढण्यासोबतच संघभावना दृढ होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
—






















