माळीनगर – महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या च्या एम पी सी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत मौजे खंडाळी तालुका माळशिरस येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कुमारी ऋतुजा शहाजी पताळे हिने घवघवीत यश संपादन करून महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयात महसूल सहाय्यक पदा पदावर निवड झाली असून कु. ऋतुजा शहाजी पताळे ही एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी असून तिचे प्राथमिक शिक्षण सदाशिवराव माने विद्यालय अकलूज येथे झाले.
उच्च माध्यमिक शिक्षण जिजामाता कन्या प्रशाला अकलूज येथे झाले त्यानंतर तीने पुणे येथील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि कृषी पदवी संपादन केली. महाराष्ट्र निवड मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात महसूल सहाय्यक पदाला गवसणी घातल्याने खंडाळी व खंडाळी परिसरातील सर्व स्तरातून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
आई वडिलांच्या प्रोत्साहनातून मी क्लास थ्री च्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन मंत्रालयात माझी महसूल सहाय्यक पदावर निवड झाली आहे. परंतु मी आता एवढ्यावरच न थांबता येत्या 17 तारखेला क्लास टू साठी परीक्षा देणार आहे.
ऋतुजा शहाजी पताळे, खंडाळी ता. माळशिरस

























