सोलापूर – सोलापूर येथील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. एस. आर. पाटील यांची नात तसेच प्रख्यात शिवचरित्र व्याख्याते व आयुर्वेदाचार्य डॉ. शिवरत्न शेटे (एम.डी. आयुर्वेद) आणि डॉ. सुप्रद्न्या शेटे यांची कन्या डॉ.आर्या शेटे हिने गोवा विद्यापीठातून बीएएमएस (बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी ) ही पदवी प्रथम श्रेणीत संपादन करून उल्लेखनीय यश मिळविले आहे.
लहानपणापासूनच शिक्षण, संस्कार आणि समाजसेवेची प्रेरणा लाभलेल्या डॉ. आर्या यांनी सातत्यपूर्ण परिश्रम, जिद्द आणि अभ्यासू वृत्तीच्या बळावर हे यश मिळविले आहे. त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, शिक्षक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Post Views: 22