करकंब – श्री.चौंडेश्वरी मंदिर कोष्टी समाज करकंब ट्रस्टचे नारायण वास्ते,प्रभाकर टेके यांच्या मार्गदर्शनाखाली समस्त कोष्टी समाज बांधवांच्या सहयोगातून शेकडो वर्षांची परंपरा असलेला दोन दिवशीय भावई उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रथम दिवशी आई चौंडेश्वरी मातेच्या महिम्न अभिषेकाने सुरुवात झाली.भारत वास्ते, लक्ष्मण वास्ते परिवाराच्या वतीने सुवासिनी पूजन व समस्त समाजबांधवांसाठी मिष्ठान्न अशा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मानसी ओगले हिचा सी.ए.पदवी प्राप्त केल्या बद्दल करकंब कोष्टी समाज बांधवांच्या वतीने सह्रदय सत्कार करण्यात आला.द्वितीय दिवशी करकंंब ग्रामस्थांना उत्सुकता असलेल्या शेकडो वर्षांची परंपरा असलेला भावई उत्सवाच्या मिरवणूकीला सुरुवात झाली.या मिरवणुकीत तरुणांनी भावही खेळत उत्साहाने सहभाग नोंदवला.ज्ञानेश्वर दुधाणे, राजकुमार दुधाणे,अनंत टकले,सुभाष भरते,विष्णू मुखरे, सोमनाथ नरखेडकर,प्रभाकर टेके, टेके परिवार.संजीवकुमार म्हेत्रे,गोविंद वेळापूरकर,चंद्रकांत फासे,भास्कर करपे,हणुमंत सांगोलकर,वसंत बुगड या मानकऱ्यांनी आई चौंडेश्वरी मातेचे स्वागत करून मनोभावे पूजा केली.ही मिरवणूक सोमवार पेठ,मोती चौक,मेन रोड,म्हसोबा, शुक्रवार पेठ,या मार्गावरून काढण्यात आली.दिलीप शिंदे (परीट) यांचे घरी शेवटची पूजा करत भावई चौंडेश्वरी मंदिरात विसावली.मंदिरामध्ये चंद्रकांत रसाळ,सतीश दुधाणे वंदना दुधाणे यांचे शुभहस्ते आरती करून प्रतिवर्षाप्रमाणे ज्या व्यक्तींनी श्री चौंडेश्वरी मातेच्या चरणीआपली सेवा अर्पण केली त्यांचा आई चौंडेश्वरी मातेचा प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला.तरुणांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचे सेवन करून दोनदिवशीय उत्सव अगदी उत्साहाने संपन्न झाला.हा उत्सव यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी भावई उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी,समस्त कोष्टी बांधव, भगिनी,युवक,युवतींनी अधिक परिश्रम घेतले.शेवटी ज्ञानेश्वर दुधाणे यांनी समस्त कोष्टी समाज बांधवांचे आभार मानले.
Post Views: 24