Thursday, October 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जिल्हा क्रिकेट असोसिएशन जालनाच्या ९ खेळाडूंची महाराष्ट्राच्या संभाव्य संघात निवड; जिल्ह्यासाठी अभिमानाची कामगिरी

तरुण भारतbyतरुण भारत
July 15, 2026
in sports
0
जिल्हा क्रिकेट असोसिएशन जालनाच्या ९ खेळाडूंची महाराष्ट्राच्या संभाव्य संघात निवड; जिल्ह्यासाठी अभिमानाची कामगिरी
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जालना – जिल्हा क्रिकेट असोसिएशन, जालना (DCA Jalna) साठी अभिमानाची बाब ठरावी अशी मोठी कामगिरी जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटूंनी केली आहे. असोसिएशनच्या तब्बल ९ खेळाडूंची महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या विविध वयोगटांतील संभाव्य संघात निवड झाली असून, त्यामध्ये ८ महिला क्रिकेटपटू आणि १ पुरुष क्रिकेटपटूचा समावेश आहे. या निवडीमुळे जालना जिल्ह्यातील क्रिकेटला नवी ओळख मिळाली असून, ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


महाराष्ट्राच्या संभाव्य संघात स्थान मिळविणाऱ्या खेळाडूंनी सातत्यपूर्ण मेहनत, नियमित सराव आणि उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ही संधी मिळवली आहे. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक ऋषिकेश काने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, त्यांच्या प्रशिक्षणातून अनेक खेळाडू राज्यस्तरावर पोहोचत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

१५ वर्षांखालील मुलींच्या संभाव्य संघात पाच जणींची निवड
१५ वर्षांखालील मुलींच्या महाराष्ट्र संभाव्य संघात संस्कृती घोरतळे, आरोही आहेर, स्नेहा जगताप, अपूर्वा रूपनर आणि सोनाक्षी गुंजाळ या पाच खेळाडूंनी स्थान मिळवले आहे. या सर्व खेळाडूंनी जिल्हास्तरीय आणि विभागीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले.

१९ वर्षांखालील मुलींच्या संघात दोन खेळाडू
१९ वर्षांखालील मुलींच्या संभाव्य संघासाठी जितेश्री दामले आणि मानिनी वायाळ यांची निवड झाली आहे. दोघींनीही सातत्यपूर्ण फलंदाजी व गोलंदाजीच्या कामगिरीच्या जोरावर राज्यस्तरीय संधी मिळवली आहे.

वरिष्ठ महिला संघात आरती केदार
वरिष्ठ महिला महाराष्ट्र संभाव्य संघात आरती केदार हिने स्थान मिळवत जालना जिल्ह्याचा मान उंचावला आहे. वरिष्ठ स्तरावरील ही निवड तिच्या मेहनतीची आणि सातत्यपूर्ण कामगिरीची पावती मानली जात आहे.

१९ वर्षांखालील मुलांच्या संघात ओंकार वाघ
पुरुष गटात १९ वर्षांखालील मुलांच्या महाराष्ट्र संभाव्य संघात ओंकार वाघ याची निवड झाली आहे. उत्कृष्ट क्रिकेट कौशल्याच्या जोरावर त्याने राज्यस्तरीय संघात स्थान मिळवले असून, भविष्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची मोठी संधी त्याच्यासमोर आहे.

जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या प्रयत्नांना यश
जिल्हा क्रिकेट असोसिएशन, जालना आणि साई काने क्रिकेट अकादमी यांच्या माध्यमातून जिल्ह्यात क्रिकेटच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आधुनिक प्रशिक्षण, नियमित सराव, स्पर्धांमध्ये सहभाग आणि खेळाडूंना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा परिणाम आता राज्यस्तरावरील निवडीच्या स्वरूपात दिसून येत आहे.

सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र देशपांडे, उपाध्यक्ष रमेश मगरे, दिलीप शहा, ॲड. श्रीकांत देशपांडे, सौरभ नाईक, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य व टूर्नामेंट कमिटीचे चेअरमन राजू काने, जॉइंट सेक्रेटरी अभिजीत चव्हाण, संतोष भारोटे, संदीप पाटील यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
तसेच खासदार डॉ. कल्याण काळे, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार अर्जुन खोतकर, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, माजी मंत्री राजेश टोपे, कैलास गोरंट्याल, भास्करराव दानवे, भास्करराव आंबेकर, विष्णू पाचफुले, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत तसेच जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी निवड झालेल्या खेळाडूंचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
जालना जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील क्रिकेटप्रेमींनीही या यशाचे स्वागत केले असून, भविष्यात या खेळाडूंमधून महाराष्ट्र आणि भारताचे प्रतिनिधित्व करणारे क्रिकेटपटू घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. खेळाडू, त्यांचे पालक, प्रशिक्षक ऋषिकेश काने, जिल्हा क्रिकेट असोसिएशन, जालना आणि साई काने क्रिकेट अकादमी यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
Post Views: 291
Previous Post

दीर्घकाळ विनापरवानगी गैरहजर सहा कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती 

Next Post

नर्गिसच्या नवऱ्याला फाशी द्या आणि कुटुंबीयांनाही अटक करा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

नर्गिसच्या नवऱ्याला फाशी द्या आणि कुटुंबीयांनाही अटक करा

ताज्या बातम्या

बीसीसीआय लेव्हल ‘ओ’ प्रशिक्षक परीक्षेत योगेश कोम्पल उत्तीर्ण

बीसीसीआय लेव्हल ‘ओ’ प्रशिक्षक परीक्षेत योगेश कोम्पल उत्तीर्ण

October 28, 2026
शहर नेटबॉल स्पर्धेत बेगम कमरुन्निसा कारीगर गर्ल्स हायस्कूलला विजेतेपद

शहर नेटबॉल स्पर्धेत बेगम कमरुन्निसा कारीगर गर्ल्स हायस्कूलला विजेतेपद

October 28, 2026
संगमेश्वर कॉलेजच्या मानस गायकवाडला राज्य बुद्धिबळ स्पर्धेत रौप्य

संगमेश्वर कॉलेजच्या मानस गायकवाडला राज्य बुद्धिबळ स्पर्धेत रौप्य

October 28, 2026

विद्यानिकेतन हायस्कूलच्या विद्यार्थिनीची विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड

October 28, 2026

जामगाव येथील ३० एकर ऊसाला अचानक आग

October 28, 2026
लाडकी बहिणयोजनेतून वगळलेल्या राज्यातील नाराज ८५ लाख महिलाना ई के वाय सी करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्या.!

लाडकी बहिणयोजनेतून वगळलेल्या राज्यातील नाराज ८५ लाख महिलाना ई के वाय सी करण्यासाठी पुन्हा एकदा संधी द्या.!

October 28, 2026
कायद्याचे ज्ञान आणि जागरूकता हीच बालकांच्या सुरक्षिततेची गुरुकिल्ली – न्यायाधीश एम. बी. कुडते

कायद्याचे ज्ञान आणि जागरूकता हीच बालकांच्या सुरक्षिततेची गुरुकिल्ली – न्यायाधीश एम. बी. कुडते

October 28, 2026

राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रतिभा निकेतनची उत्तुंग भरारी! आशुतोष बाबरची राज्यात द्वितीय क्रमांकाची कामगिरी

October 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1432256

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!