सोलापूर – शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या सोलापूर जिल्हयातील नूतन पदाधिकारी निवडी मातोश्री मुंबई येथून नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. यामध्ये इतर पदाधिकाऱ्यांसोबत सोलापूर लोकसभा प्रमुख पदी उत्तर सोलापूर तालुक्याचे तालुका प्रमुख संजय पौळ यांची सार्थ निवड करण्यात आली असून, या निवडी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाकरे यांनी पक्षाचे मुखपत्र दैनिक सामना मधून जाहीर केल्या आहेत.
पौळ यांच्या निवडीने निष्ठावंत शिवसैनीकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे इतकेच नाही तर सर्वपक्षीय राजकीय लोकांनी सुद्धा या निवडीचे जाहीर स्वागत केले आहे. पक्षाशी वैचारीक वेगळी भुमीका असणाऱ्या पक्षांच्या पदाधीकारी व कार्यकर्त्यांनी सुद्धा संजय पौळ यांच्या निवडीचा जाहीरपणे आनंद व्यक्त करून अभीनंदन केले आहे.
बाल शिवसैनीक म्हणून गुळवंची सारख्या छोटयाशा गावातून सुरुवात केली. बालवयातच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने व वक्तृत्वाने त्यांच्यावर संस्कार केले असल्याने त्यांनी पक्षावर अनेक संकट आली तरी कधीही त्यांनी पक्षाशी प्रतारणा न करता अधिक जोमाने काम केले.






















