अक्कलकोट – बुधवार, गुरुवार सलग दोन दिवस अक्कलकोट नगरपालिकेने सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी मोहिम राबविली . वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर परिसरातील अन्नछत्र मंडळ समोर , ३oमीटर प्रस्तावित मंगरुळे चौक पासून अन्नछत्र मंडळपर्यत रस्त्यात्यावर अडथळा असलेली सर्व निवासी विनापरवाना घरे दुकाने जनाजा मज्जीद ;माणिक पेठ परिसरातील आदि ९५ % . आतिक्रमण अनधिकृत बांधकाम दुकाने काढली आहेत . पाच टक्के न्याय प्रविष्ठ निवासी घरे लॉज बांधकाम बाकी आहे .
तीर्थक्षेत्र अक्कलकोट दत्त अवतार स्वामी महाराज यांच्या पदस्पर्शाने लिला कार्याने पावन झालेली ही भुमी आहे . ही भुमी अधिक सुंदर अतिक्रमणमुक्त असावी . भाविकाना कुठल्याही प्रकारे येथे त्रास होऊ नए .पर्यटक स्वामी भक्त यात्री येथे अधिक काळ राहिले . येथील स्वामीच्या विविध मठ मंदिर यास भेट दिली तर येथील व्यवसाय वाढेल . रोजगार वाढेल . पर्यटक वाढतील . तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहर सुंदर ठेवण्याची प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे . यामुळे नागरिकांनी स्वतःहुन अतिक्रमण काढावे असे आवाहन गुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले आहे .
तीर्थक्षेत्र अक्कलकोटी दिवसोदिवस येणाऱ्या स्वामी भक्त पर्यटक यात्री यांची संख्या तीव्र झपाटयान वाढत आहे . भाविकांची संख्या वाढल्याने सोयीसुविधा रस्ते अतिक्रमण भाविकाना नागरिकाना त्रास होणार नाही सुरक्षित वावर याबाबत खबरदारी घेणे गरजेचे आहे .
भाविकांची वाढती संख्या यामुळे नव्याने नागरी सुविधा रस्ते विकास याची निकड निर्माण झाली आहे . . तीर्थक्षेत्र अक्कलकोट विकासाकरिता आ . सचिन कल्याणशेट्टी यांनी मोठा विकास निधी शासनाकडुन मंजुर करुन घेतला . हत्ती तलाव सुशोभिकरण काम चालु आहे . शहरात .. तीर्थक्षेत्र अक्कलकोट झपाट्याने बदलत आहे . महाराष्ट्रात एक मॉडेल बसस्थानक बनेल असे अक्कलकोट बसस्थानकाचे काम प्रगतीपथावर आहे .
मल्लीकार्जुन मंदिराचे जीर्णोध्दार काम प्रगतीपथावर आहे . तीर्थक्षेत्र अक्कलकोट सुंदर अतिक्रमण मुक्त भाविकाना त्रास होणार नाही असे स्वच्छ सुंदर ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे . नागरिकांनी अतिक्रमण स्वतःकाढुन नुकसान टाळावे नगर पालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी केले आहे .

















