Friday, June 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जिल्हा परिषद कृषी विषय समितीच्या पहिल्या सभेत शेतकरी हिताचे महत्त्वपूर्ण ठराव मंजूर

तरुण भारतbyतरुण भारत
April 25, 2026
in editor
0
जिल्हा परिषद कृषी विषय समितीच्या पहिल्या सभेत शेतकरी हिताचे महत्त्वपूर्ण ठराव मंजूर
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – जिल्हा परिषद कृषी विभागाच्या नवनिर्वाचित विषय समितीची पहिली सभा (दि. २४) जिल्हा परिषद येथील शिवरत्न सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी कृषी समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी होते. नवनिर्वाचित सदस्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत शेतकरी हिताचे अनेक महत्त्वपूर्ण विषय चर्चेला घेण्यात आले आणि विविध ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. 

        यावेळी कृषी समितीच्या पहिल्याच सभेत शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस भूमिका घेतल्याने उपस्थित सदस्यांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील शेती विकास, तांत्रिक सुविधा आणि शेतकरी सक्षमीकरणासाठी समिती आगामी काळात अधिक प्रभावीपणे काम करणार असल्याचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी यांनी यावेळी सांगितले.

        सभेच्या प्रारंभी सर्व नवनिर्वाचित सदस्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते सदस्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी क्षेत्रातील प्रश्नांवर गांभीर्याने चर्चा करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आले.

      जिल्ह्यात सध्या माती परीक्षणासाठी केवळ एकच प्रयोगशाळा उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना माती परीक्षणासाठी मोठा प्रवास करावा लागतो. वेळ आणि खर्च दोन्ही वाढत असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र माती परीक्षण प्रयोगशाळा सुरू करण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतजमिनीची सुपीकता तपासणे आणि त्यानुसार पीक नियोजन करणे अधिक सोयीचे होणार आहे.

       ग्रामीण भागात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा वेळोवेळी जाणवत असल्याने अनेक कुटुंबांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः युद्धजन्य परिस्थितीमुळे पुरवठा साखळीवर परिणाम होत असल्याने गॅस उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी पर्याय म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने बायोगॅस संयंत्र उभारणी करावी, यासाठी        शासनाकडून वाढीव निधी, अतिरिक्त लक्षांक आणि अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला.

रासायनिक खते, बियाणे आणि कीटकनाशके     यांसारख्या निविष्ठा परवान्यांचे अधिकार पूर्वी कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे होते. मात्र सन २०१८ पासून हे अधिकार राज्य शासनाने काढून घेतल्याने शेतकरी, विक्रेते आणि संबंधित घटकांची गैरसोय होत असल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे निविष्ठा परवाने देण्याचे अधिकार पूर्ववत जिल्हा परिषद कृषी विकास अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात यावेत, असा ठराव मंजूर करण्यात आला.

 

आधुनिक शेतीसाठी ट्रॅक्टरचलित अवजारे अत्यावश्यक ठरत आहेत. मात्र त्यांची किंमत जास्त असल्याने अनेक शेतकऱ्यांना ती खरेदी करणे परवडत नाही. यासाठी ट्रॅक्टरचलित औजारे खरेदीसाठी वाढीव अनुदान आणि जास्तीत जास्त लाभार्थी संख्येसाठी अतिरिक्त लक्षांक मंजूर करण्यात यावेत, असा ठराव करण्यात आला. हा विषय जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मांडण्याचेही निश्चित करण्यात आले. बैठकीत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील कृषी साहित्य, अवजारे खरेदी आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विभागीय अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती सभेपुढे मांडली.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तसेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजनांतर्गत अनुसूचित जाती व जमातीतील शेतकऱ्यांना विविध अनुदानाचा लाभ दिला जातो. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचाव्यात, यासाठी व्यापक प्रचार-प्रसिद्धी आणि जनजागृती करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.

Post Views: 36
Previous Post

भोंदू’ मामा ‘च्या मुसक्या आवळल्या ..

Next Post

केंद्रीय मुख्याध्यापक सूर्यकांत काळे यांचा सेवागौरव सोहळा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
केंद्रीय मुख्याध्यापक सूर्यकांत काळे यांचा सेवागौरव सोहळा

केंद्रीय मुख्याध्यापक सूर्यकांत काळे यांचा सेवागौरव सोहळा

ताज्या बातम्या

जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्यासह उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी केले मतदान

जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्यासह उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी केले मतदान

June 18, 2026
स्वैच्छिक रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे यावे : डॉ. जयकर

स्वैच्छिक रक्तदानासाठी नागरिकांनी पुढे यावे : डॉ. जयकर

June 18, 2026
शहर व तालुका वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा

शहर व तालुका वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा

June 18, 2026
प्रशाला क्र. १ कॅम्प येथे प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

प्रशाला क्र. १ कॅम्प येथे प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न

June 18, 2026
दि प्रोग्रेसिव्ह हायस्कूल येथे प्रवेशोत्सव उत्सहात साजरा

दि प्रोग्रेसिव्ह हायस्कूल येथे प्रवेशोत्सव उत्सहात साजरा

June 18, 2026
सोलापूर जिल्ह्यातील शरद भोसले पुरस्काराने सन्मानित

सोलापूर जिल्ह्यातील शरद भोसले पुरस्काराने सन्मानित

June 18, 2026
बीपीएमएस पोर्टलवरून टीडीआर प्रमाणपत्रांचे वितरण

बीपीएमएस पोर्टलवरून टीडीआर प्रमाणपत्रांचे वितरण

June 18, 2026
सोलापूरचे चित्रकार डॉ. डग्लस जॉन, रामचंद्र खरटमल यांचा अयोध्यानगरीत कलाविष्कार

सोलापूरचे चित्रकार डॉ. डग्लस जॉन, रामचंद्र खरटमल यांचा अयोध्यानगरीत कलाविष्कार

June 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0919625

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697