माढा : छत्रपती शिवाजी महाराजांन विषयी अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल बागेश्वर बाबाचा माढा तालुका काँग्रेस कमिटीने निषेध व्यक्त करून सोमवार दिनांक २७ एप्रिल रोजी
माढा तहसीलदार संजय भोसले यांना निवेदन देऊन शासनाने संबंधित बाबावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांच्या बद्दल कोणत्याही प्रकारचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली. संबंधित व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच महाराष्ट्रात प्रवेशबंदी घालण्याची मागणीही करण्यात आली.
या प्रसंगी तालुका काँग्रेस कमिटीचे चे अध्यक्ष संजय पाटील, जिल्हा काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस जहीर मणेर, कुर्डुवाडी ब्लॉक शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष फिरोज खान, तालुका उपाध्यक्ष संपत काळे, कुर्डुवाडी शहर काँग्रेस कमिटी अल्पसंख्याक चे अध्यक्ष हमीद शिकलकर, तालुका अध्यक्ष अल्पसंख्याक जमीर काझी, माढा शहर काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष पृथ्वीराज साठे, कुर्डुवाडी शहर काँग्रेस कमिटी चे सचिव निलेश गवळी,ज्ञानदेव सुतार व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


























