पिलीव – माळशिरस तालुक्यातुन जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गला विरोध करण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरविण्याबाबत निमगाव येथे शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. माळशिरस तालुक्यातुन नेवरे ते गारवाङ हा शक्तीपीठ महामार्ग संपुर्ण बागायत पट्यातुन जात असुन जे बाधीत शेतकरी आहेत. त्यांचे प्रपंच उध्वस्त होणार आहेत
अशा जुल्मी शक्तीपीठ ला ताकदीनीशी विरोध तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांनी करण्याचे सर्वानुमते ठरले शक्तीपीठ हा ज्यांच्या शेतातून जात आहे त्यांना अनेक दलांनी भुरळ पाङुन टक्केवारीचे आमीष दाखवून उभी पिके जमीनदोस्त करून करार पध्दतीने आंबा लागवड करण्यास भाग पाडले तर ही योजना फसवी असुन शेतकऱ्यांना या पासुन फायदा कसलाच मिळणार नाही.
नुकसानच होणार आहे तरी बाधीत शेतकऱ्यांनी अशा फसव्या योजनांना बळी पङु नये असे आवाहन सभापती दत्ता मगर यांनी केले .
या वेळी के के पाटील, हनुमंत पवार ,संभाजीराव मगर यांनी शेतकऱ्यांना एकजुटी अंदोलन करण्याचे आवाहन केले.
ॲड लक्ष्मण मगर, महादेव मगर, उत्तम पाटील ,भारत मगर ,उत्तम शेळके ,दत्तञाय मगर, विष्णुपंत मगर ,महावीर मगर ,सौरभ मगर यासह गारवाङ ,चांदापुरी ,वेळापुर येथील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते .
आभार रामभाऊ मगर यांनी मानले. फोटो _ निमगाव येथे शक्तीपिठ महामार्गाला विरोध याबाबत बोलताना सभापती दत्ताञय मगर.

























