अक्कलकोट : गौतम बुद्ध यांनी मानवतेची शिकवण दिली, त्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार संपूर्ण जगात झाला परंतु आता त्यांच्या शिकवणुकीचा विसर पडल्यामुळे विध्वंसक जागतिक युद्ध सुरू झाले आहे, हे युद्ध थांबवायचे असेल तर युद्ध नको बुद्ध हवा ही तत्व प्रणाली स्वीकारली पाहिजे असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने गौतम बुद्ध जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन मसुती, प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, इराण अमेरिका युद्धामुळे जगामध्ये अशांतता आहे. पेट्रोल गॅस च्या किमती भडकले आहेत, जीवघेणी स्पर्धा विकोपाला गेली आहे, अशा स्थितीत गौतम बुद्धांचे तत्त्वज्ञान आचरणात आणून जगातील मानव जातीस दिलासा देण्याची भूमिका जागतिक राजकारण्यांनी घेतली पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले सूत्रसंचलन प्रा डॉ शितल झिंगाडे भस्मे यांनी केले आभार कार्यक्रमाधिकारी प्रा राजशेखर पवार यांनी मानले कार्यक्रमास प्रा मनीषा शिंदे, प्रा शितल फुटाणे, प्रा जनाबाई चौधरी, प्रा हर्षदा गायकवाड, प्रा सौरभ भस्मे प्रा ओंकार घिवारे, प्रा शिवकुमार मठदेवरु उपस्थित होते.
फोटो ओळ
कल्याणशेट्टी महाविद्यालयात गौतम बुद्धाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यावेळी मल्लिनाथ कल्याणशेट्टी व मान्यवर
























