वळसंग – सनई-चौघडयांच्या ‘मंगल’सुरात हजारो व-हाडी मंडळी व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत बोरामणी येथे शुक्रवारी , सायंकाळी ६ वाजून २१ मिनिटांच्या मुहूर्तावर एस.व्ही.सी.एस.प्रशालेच्या प्रागणांत पाच जोडप्यांच्या सप्तपदीच्या ‘रेशीमगाठया’ बांधण्यात आल्या.यावेळी उपस्थित सर्व नागरिकांनी नव वधू-वरांस शुभाशिर्वाद देऊन त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश आचलारे यांच्यावतीने गेल्या १४ वर्षापासून मोफत सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळयांचे आयोजन करण्यात येत असून आतापर्यंत २७८ जणांचे रेशीमगाठी बांधण्यात आले आहेत.या विवाह सोहळयास व-हाडी मंडळीसाठी स्नेहभोजनांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.यावेळी संयोजन समितीतर्फे वधूस मणी-मंगळसूत्रसह सौभाग्य अंलकार,शालू तसेच नवरदेवास सफारी पोषाखसह हळदीचे कपडे देण्यात आले.यावेळी वधू-वरांचे गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आले.त्यानंतर आकर्षक मांडवात धार्मिक मंत्रोपचारात मंगलमय अक्षता सोहळा संपन्न झाला.
यावेळी खासदार डॉ ज्योती वाघमारे,
माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख अमर पाटील व अमोल शिंदे, जिल्हा परिषद शिवराज म्हेत्रे, दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे, दिलीप सिध्दे,बाळासाहेब वाघमारे, सुनील बनसोडे, आनंद तानवडे ,सुदर्शन साठे व बोरामणी गटातील मान्यवर व आदि उपस्थित होते.
यावेळी संयोजक आचलारे म्हणाले,
विवाह सोहळयात सहभागी झालेल्या वधू-वरांस पहिली मुलगी झाल्यास त्या मुलींचे नांवे धनेश आचलारे यांच्यावतीने ‘मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे कन्यारत्न’ योजनेतंर्गत त्या मुलींच्या नांवे अकरा हजाराची ठेव बँकेत ठेवली जाणार आहे.अठरा वर्षानंतर वाढीव रक्कम त्या मुलीला मिळणार आहे.
विवाह सोहळा यशस्वी होण्यासाठी आचलारे मित्र व ग्रामस्थ व परिवाराने परिश्रम घेतले.
नुकतेच, जिल्हा परिषद निवडणुकीत धनेश आचलारे यांचा पराभव झाला तरी त्यांनी आपल्या सामाजिक कार्यात खंड पडू दिला नाही.समाजकार्य करून ते सामाजिक ऋण फेडण्याचे काम करीत आहेत असेच उपक्रम राबवित राहा एक दिवस निश्चितच यश मिळेल आणि तुमच्या पाठीशी समाज आणि होटगी बृहन्मठ कायम पाठिशी राहील असा आशीर्वाद काशीपीठाचे जगद् गुरू डॉ मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिले.
समाजात अलीकडच्या काळात नेहमी महागाई,दुष्काळी परिस्थिती असते.त्यामुळे गोर-गरिब कुटुंबातील मुला-मुलींचे विवाहास अडचणी येतात.त्यासाठी अशा सामाजिक उपक्रमाची समाजाला नितांत गरज आहे.ती गरज धनेश आचलारे मित्र परिवारांतर्फे पूर्ण होत आहे.ही बाब कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार खासदार डॉ ज्योती वाघमारे व माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी काढले.


























