अकलूज – उपवर्गीकरणामुळे कोणाही समाजावर अन्याय होणार नसला तरी अनुसूचित जातीच्या जागा जनरलला देऊ नये अशीच आपली भूमिका राहणार असल्याचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.पुढे ते म्हणाले की,उपवर्गीकरणाबाबत राज्याने स्थापन केलेल्या समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही. मात्र लोकसंख्येच्या प्रमाणात सर्वच जाती-धर्माच्या लोकांना आरक्षण देण्यात येणार असल्याने कोणावरही अन्याय होणार नाही.
राज्यात एससी मध्ये ५९ जाती असून आता होणाऱ्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या प्रमाणात इतर जातींनाही आरक्षण मिळणार आहे. कोणत्याही जाती-धर्मांच्या वर अन्याय होऊ नये अशीच आपली ठाम भूमिका आहे
मात्र अनुसूचित जातीच्या जागा जनरलला देऊ नये यावर आपण ठाम आहोत.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले आहे,मात्र विजय मिळाला की ईव्हीएमचे नाव घेतात हे बरोबर नाही. ममता बॅनर्जींच्या राज्यात राजकीय हिंसाचार व महिलांवर अत्याचार वाढले होते, गत निवडणुकीत त्यांनी भावनिक साद घालून सत्ता मिळवली, मात्र यावेळेस भाजपला यश मिळाले. आपल्या पक्षाचाही भाजपला चांगला फायदा होत आहे,त्यामुळेच आपल्याला तिसऱ्यांदा राज्यसभा मिळाली.त्यानिमित्ताने आपण दिल्लीत रहात असल्याने आपला पक्षही अनेक राज्यात वाढला आहे. मणिपूर व नागालँड येथे आपल्या पक्षाला मान्यता मिळाली आहे शिवाय आपल्या पक्षास राष्ट्रीय म्हणून मान्यता मिळविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहे.
येथील बाबासाहेब आंबेडकर शासकीय वस्तीगृहाच्या प्रश्नातही नक्की लक्ष घालण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, सुनील सर्वगोड, नंदकुमार केंगार, किरण धाईंजे,दया धाईंजे आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेनंतर त्यांनी माझी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची शिवरत्न बंगला येथे जाऊन भेट घेतली व प्रकृतीची विचारपूस केली यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते


























