Monday, July 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भाजपाच्या उमेदवारीवर सोलापुरात खल सुरू; निष्ठावंत संघटन योद्धा चव्हाण की अनुभवी प्रभावी परिचारक? जयकुमार गोरे यांच्या भूमिकेकडे लक्ष

तरुण भारतbyतरुण भारत
May 19, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गेली अनेक वर्षे प्रलंबित राहिलेल्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची अखेर घोषणा झाली आणि त्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. भाजपाकडून उमेदवारी कोणाला मिळणार, यावरून सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली असून माजी आमदार प्रशांत परिचारक आणि भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण ही दोन नावे आघाडीवर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे “अनुभवाला संधी की संघटन निष्ठेला पुरस्कार?” असा प्रश्न भाजप कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात आवश्यक मतदारसंख्या उपलब्ध नसल्यामुळे ही निवडणूक वारंवार लांबणीवर पडली होती. मात्र यंदा जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांनंतर मतदारसंघाची आवश्यक रचना पूर्ण झाल्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता भाजपासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.
भाजपमध्ये सध्या अनेक इच्छुकांची नावे चर्चेत असली तरी अंतिम फेरीत प्रशांत परिचारक आणि शशिकांत चव्हाण यांच्यातच खरी स्पर्धा असल्याचे मानले जात आहे. प्रशांत परिचारक हे जिल्ह्याच्या राजकारणातील प्रभावी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जातात. 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी “मी माझ्या कार्यकर्त्यांना कुणाच्याही दावणीला बांधणार नाही,” अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळे ते विधानसभा आखाड्यात उतरणार अशी चर्चा होती. मात्र पक्ष नेतृत्वाने त्यांची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. त्या वेळी पक्षाने त्यांना कोणते आश्वासन दिले होते, याबाबत अद्याप राजकीय वर्तुळात उत्सुकता कायम आहे. त्यामुळे विधान परिषद उमेदवारी हीच त्या तडजोडीचा भाग आहे का, यावर चर्चा सुरू आहे.
दुसरीकडे शशिकांत चव्हाण यांनी सामान्य कार्यकर्त्यापासून जिल्हाध्यक्षपदापर्यंतचा प्रवास करत संघटनात्मक पातळीवर स्वतःची मजबूत ओळख निर्माण केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडीऐवजी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची भूमिका त्यांनी सुरुवातीपासून ठामपणे मांडली. त्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही त्यास समर्थन दिले. परिणामी जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये भाजपला ऐतिहासिक यश मिळाले. जिल्ह्यात कधीच पूर्णपणे सत्तेत नसलेला भाजप आज अनेक स्थानिक संस्थांमध्ये निर्णायक भूमिकेत आहे. त्यामुळे “यशस्वी संघटन नेतृत्वाला आता विधान परिषदेत संधी मिळणार का?” असा सवाल कार्यकर्त्यांतून उपस्थित होत आहे.
भाजपमध्ये अलीकडे काही नवे चेहरेही दाखल झाले असले तरी पक्ष एवढ्या महत्त्वाच्या निवडणुकीत नवख्या चेहऱ्यावर विश्वास दाखवेल का, याबाबत साशंकता आहे. कारण 2029 च्या राजकीय समीकरणांचाही विचार पक्षाला करावा लागणार आहे. अनुभवी नेतृत्व आणि निष्ठावंत संघटनकार्यातील संतुलन साधत भाजप कोणता निर्णय घेते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, पक्षाकडून गोपनीय सर्वेक्षण सुरू असल्याचीही चर्चा आहे. मतदारसंघातील स्थानिक संस्थांमधील राजकीय समीकरणे, मतदारांमधील स्वीकारार्हता, आगामी विधानसभा निवडणुकांवरील परिणाम आणि संघटनात्मक ताकद या सर्व बाबींचा अभ्यास करूनच अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.या संपूर्ण प्रक्रियेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भूमिका निर्णायक मानली जात आहे. जिल्ह्यातील नव्या भाजप संघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे ते कोणत्या नावाला पसंती देतात, यावरच उमेदवारीचे अंतिम चित्र ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजप “राजकीय वजन” पाहणार की “संघटन निष्ठा” याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Post Views: 27
Previous Post

‘एस के बनाना’कडून शेतकऱ्यांचे कोट्यवधी थकले? कारवाईची मागणी — संजय (बाबा) कोकाटे

Next Post

अल्पवयीन माता नोंदणी प्रकरणात आशा सेविका, कर्मचाऱ्यांना धमक्या येत असल्याचा आरोप

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अल्पवयीन माता नोंदणी प्रकरणात आशा सेविका, कर्मचाऱ्यांना धमक्या येत असल्याचा आरोप

ताज्या बातम्या

सायकलच्या धक्क्यावरून वाद; उजनीत मध्यस्थी करणाऱ्या चुलत्याचा दगड मारून खून

July 5, 2026
खुनेश्‍वर मध्ये शेती विषयी मोबाईल अ‍ॅप्सच्या प्रात्यक्षिकासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी बनल्या कृषीकन्या

खुनेश्‍वर मध्ये शेती विषयी मोबाईल अ‍ॅप्सच्या प्रात्यक्षिकासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी बनल्या कृषीकन्या

July 5, 2026
विमल कन्या प्रशाला, श्री शिवाजी मराठी विद्यालयात कृतज्ञता सोहळा  

विमल कन्या प्रशाला, श्री शिवाजी मराठी विद्यालयात कृतज्ञता सोहळा  

July 5, 2026

सहाशे किमी सायकलिंग केवळ ३३.४७ तासात पूर्ण : आयर्नमॅन कैलास झोळगे यांचा विक्रम

July 5, 2026

बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासकीय नोकरी मिळविली – अहमद नगरच्या तरुणावर सोलापुरात फसवणुकीचा गुन्हा दाखल

July 5, 2026
पोलिस आणि  जनतेमध्ये समन्वय साधून काम करणार – डीवायएसपी राजेंद्र टाकणे

पोलिस आणि  जनतेमध्ये समन्वय साधून काम करणार – डीवायएसपी राजेंद्र टाकणे

July 5, 2026

ध्यान केल्याने मन प्रसन्न राहते.. ओंकारेश्वर उटगे

July 5, 2026
मोहोळ सोलापूर पासून तोडू नका : उपमुख्यमंत्री  पवार यांच्याकडे यांची मागणी 

मोहोळ सोलापूर पासून तोडू नका : उपमुख्यमंत्री  पवार यांच्याकडे यांची मागणी 

July 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0960736

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!