सोलापूर – येथील सेंट जोसेफ हायस्कूलचे माजी विद्यार्थी आणि सध्या सोलापूरमध्ये आयकर अधिकारी म्हणून कार्यरत असलेले उत्कृष्ट टेबल टेनिसपटू मनीष रावत यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.
दक्षिण कोरिया येथे ६ जूनपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत ते भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. २०२५ मध्ये झालेल्या राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत मनीष रावत यांनी अत्यंत चमकदार कामगिरी केली होती. त्यांच्या
उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांची या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यांचे सोलापूर जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजीव प्रधान, सचिव झेड. एम. पुणेकर आणि डॉ. नितीन तोष्णीवाल यांच्यासह जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी अभिनंदन केले असून, आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील यशासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
——-
















