पिलीव – माळशिरस तालुक्यासह पिलीव परिसरात सध्या सुर्य अक्षरश आग ओकत आहे .तापमानाने कधी नव्हे ते चाळीस पार केली आहे .सध्या कधी नव्हे ते तापमान 42 अंशापर्यंत पोहचले आहे. सकाळी 9 वाजल्यापासूनच प्रचंड उन्हाचा तडाखा सुरु होतोय ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत उन्हाचा तडाखा जाणवत आहे.यामुळे सकाळी 9 वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत बाजारपेठ अक्षरश ओसाड पडत आहे.कधी नव्हे ते यंदा प्रचंड उन्हाचा तडाखा व अतिशय उष्ण असे तापमान यामुळे जनजिवन तर पुर्णत विस्कळीत झाले आहेच.पण या तापमानाचा लहान मुले, वयस्कर नागरिक, जनावरे यांना प्रचंड ञास सहन करावा लागत आहेच पण यामुळे आजाराचे प्रमाण वाढले आहे .यासाठी नागरिक, मुले विहरीत व कॅनाॅल मध्ये पोहणे. थंड पेयाचा वापर करणे तसेच दिवसभर झाडाच्या सावलीत बसणे याचा सर्रास या उष्णतेपासून स्वतच बचाव करण्यासाठी उपाययोजनाचा चालु आहेत. सध्या यामुळे सुळेवाडी, बचेरी, शिंगोर्णी भागात विहीरींनी तळ गाठला असुन पिण्याच्या पाण्याची सध्या भिषण टंचाई जाणवत आहे.त्यातच पिलीव सोडुन आसपासच्या इतर भागात सध्या दहा _ दहा तास लोडशेडिंग सुरु आहे .यामुळे तर नागरिकांचा जिव अक्षरश मेटाकुटीस आला आहे.माञ मे महिन्याच्या अखेरीस मोठा पाऊस पडल्याशिवाय तापमान कमी होणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जात आहे .पण तोपर्यंत नागरिकांचा ऊन व उष्णतेमुळे जिव अक्षरश मेटाकुटीस आला आहे .
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...














