Monday, July 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शिवरात्र बंगल्यावर शक्तिपीठ महामार्ग संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक

तरुण भारतbyतरुण भारत
May 19, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अकलूज – शिवरत्न बंगला, यशवंतनगर येथे शक्तिपीठ महामार्ग संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील व आमदार उत्तमराव जानकर यांच्या उपस्थितीत बाधित शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या.
या बैठकीमध्ये शक्तिपीठ महामार्गाची सद्यस्थिती, मोबदला, रेडी रेकनर दर, 20% कपात, GST संदर्भातील गैरसमज, सर्व्हिस रोड, अंडरपास, पाईपलाईनसाठी डक्ट, जुनी-नवी आलाइनमेंट याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली              आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी प्रास्ताविकात हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार पासून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांद्या पर्यंतचा हा ८५६ किमी लांबीचा १३ जिल्हयातून जाणारा रस्ता असून सोलापूर जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ४३ गावातून १२९ किमी रस्ता जात आहे.या महामार्गावर पानगाव, करकंब तसेच वेळापूर येथे इंटर चेंज आहेत.हा रस्ता पूर्ण भरावाचा असून दर ५०० मिटर अंतरावर अंडरपास तसेच कच्चे सेवा रस्ते आहेत.या मार्गात जमिनी जाणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना त्यांची संमती असेल तर रेडी रेकानर च्या ५ पट मोबदला दिला जाणार असल्याचे तसेच सन २०२३ नंतर या जमिनीत केलेल्या बदलाचा मोबदला दिला जाणार नसल्याचे सांगितले..तत्पूर्वी माढा लोकसभा मतदार संघातील या प्रत्येक बाधित शेतकऱ्यांच्या जमिनीत जाऊन त्याच्या अडचणी व भावना समजून घेण्याचे आश्वासन खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिले.
   बहुचर्चित नागपूर गोवा शक्तिपीठाबाबतचे गैरसमज दूर करण्याबरोबरच बाधितांच्या अडचणी समजून घेण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत येथील शिवरत्न बंगल्यावर रविवारी संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
   यावेळी खा.धैर्यशील मोहिते पाटील, आ.रणजितसिंह मोहिते पाटील, आ.उत्तमराव जानकर,सभापती दत्ता मगर,माजी अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील,अर्जुनसिंह मोहिते पाटील,नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील आदी उपस्थित होते.
   यावेळी या शक्तिपीठाचा आराखडा तयार करणाऱ्या पुण्याच्या मुनाच कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांनी प्रास्ताविकात हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार पासून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांद्या पर्यंतचा हा ८५६ किमी लांबीचा १३ जिल्हयातून जाणारा रस्ता असून सोलापूर जिल्ह्यातील ४ तालुक्यातील ४३ गावातून १२९ किमी रस्ता जात आहे.या महामार्गावर पानगाव, करकंब तसेच वेळापूर येथे इंटर चेंज आहेत.हा रस्ता पूर्ण भरावाचा असून दर ५०० मिटर अंतरावर अंडरपास तसेच कच्चे सेवा रस्ते आहेत.या मार्गात जमिनी जाणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना त्यांची संमती असेल तर रेडी रेकानर च्या ५ पट मोबदला दिला जाणार असल्याचे तसेच सन २०२३ नंतर या जमिनीत केलेल्या बदलाचा मोबदला दिला जाणार नसल्याचे सांगितले.
यावेळी आक्रमक होत आमदार उत्तमराव जानकर यांनी शासनाचा हा जी आर चुकीचा असून संयुक्तिक मोजणीच्या वेळी असणारी परिस्थिती पाहून तसेच संबंधित शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची संमती घेऊनच हा रस्ता झाला आहे,या रस्त्याचा स्थानिक शेतकऱ्यांना कसलाही फायदा नाही,रेडी रेकनर चे प्रत्येक गावांचे दर वेगळे आहेत.शासनाने बळाचा वापर करून संयुक्तिक मोजणी केली तर ती आम्ही चालू देणार नाही असा इशारा दिला.
 यावेळी मुनाच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी प्रश्नोत्तरात सध्याची परिस्थिती आम्ही नकाशात घेणार असून मोबदल्याची दि.३० जानेवारी २०२३ च्या मार्गदर्शक तत्त्वांचा वापर करणार असल्याचे सांगितले.
  यावेळी खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी बोलताना या रस्त्यात कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता ज्यांची खरेच अडचण असेल त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत.त्यासाठी आपण या मतदार संघातील या महामार्गाचे जे बाधित शेतकरी आहेत,त्या प्रत्येकाच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन त्याची अडचण समजून घेऊन नंतर केवळ बाधित शेतकऱ्यांचीच बैठक घेऊ असे सांगितले.
  यावेळी सभापती दत्ता मगर, माजी सभापती मच्छिंद्र ठवरे,चंद्रकांत मगर,उत्तमराव पाटील अरण येथील अरणदिवे सर आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या  या बैठकीसाठी माढा लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ते व त्यांच्या जमिनी यासाठी संपादित होणार आहे असे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते  यावेळी आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी मतदार याद्या नाव नोंदणी सुरू आहे तसेच पदवीधर मतदार संघाची ही नाव नोंदणी सुरू आहे याबाबत सविस्तर माहिती देऊन तालुक्यातील पाटबंधारे खात्याच्या कडून पाण्याची सद्यस्थिती याची माहिती घेतली  ===          चौकट  =======        एकरी १० कोटी दिले तरी आम्हाला नको,मात्र आमच्या गावातून रस्ता नको अशा निमगाव करांच्या ठाम विरोधाबरोबरच वेळापूर,अरण, करकंब येथील बाधित शेतकऱ्यांचा कडाडून विरोध झाल्यानंतर अखेर या बाधित शेतकऱ्यांची पुन्हा एकदा बैठक घेऊन तोडगा काढण्याचा निर्णय बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.==-====                   चौकट खासदार धैर्यशील मोहिते पाटील 21 तारखेनंतर माढा लोकसभा मतदार संघातील शक्तीपीठ महामार्गामध्ये येणाऱ्या गावांमध्ये जाऊन  व ज्यांच्या जमिनी जाणार आहेत त्या शेतकऱ्यांची बैठक घेऊन अडचणी समजून घेणार आहेत——–
Post Views: 35
Previous Post

पानगांवातील संत तुकाराम विद्यालयात दहावी-बारावी मधील गुणवंतांचा सन्मान

Next Post

सोलापूरचे आयकर अधिकारी मनीष रावत यांची आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सोलापूरचे आयकर अधिकारी मनीष रावत यांची आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी निवड

ताज्या बातम्या

बटगिरी कारखानाला आग दोन महिलांना वाचवले #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

कुंभारी एमआयडीसीच्या प्रस्तावाला उद्योगच्या समितीचा हिरवा कंदील #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

मिसिंग लिंकला पहिल्याच पावसात फटका #viral #maharashtranews #marathinews

July 6, 2026

निराळे वस्ती मनोहर झोपडपट्टी अतिक्रमण हटविले….. #viral #marathinews #solapurnews

July 6, 2026

सायकलच्या धक्क्यावरून वाद; उजनीत मध्यस्थी करणाऱ्या चुलत्याचा दगड मारून खून

July 5, 2026
खुनेश्‍वर मध्ये शेती विषयी मोबाईल अ‍ॅप्सच्या प्रात्यक्षिकासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी बनल्या कृषीकन्या

खुनेश्‍वर मध्ये शेती विषयी मोबाईल अ‍ॅप्सच्या प्रात्यक्षिकासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी बनल्या कृषीकन्या

July 5, 2026
विमल कन्या प्रशाला, श्री शिवाजी मराठी विद्यालयात कृतज्ञता सोहळा  

विमल कन्या प्रशाला, श्री शिवाजी मराठी विद्यालयात कृतज्ञता सोहळा  

July 5, 2026

सहाशे किमी सायकलिंग केवळ ३३.४७ तासात पूर्ण : आयर्नमॅन कैलास झोळगे यांचा विक्रम

July 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0961437

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!