सोलापूर – केगाव येथील भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे प्रवेश प्रक्रिये बाबत मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आली असून त्याचे उद्घाटन महाविद्यालयाचे अकॅडमिक डीन अझरुद्दीन पेरमपल्ली यांचे हस्ते पीत कापून करण्यात आली आहे.
या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गायकवाड व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल देशमाने व सर्व विभागाचे विभाग प्रमुख सर्व शिक्षक शिक्षकेतर वर्ग उपस्थित होते.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य बोलताना म्हणाले की विद्यार्थ्यांना योग्य करियर दिशा व प्रवेश प्रक्रिया बाबत अचूक मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने सोलापूर येथील भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेश मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे राज्यभर सुरू असलेले प्रवेश प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर अनेक विद्यार्थी व पालकांना योग्य शाखा निवड, सीईटी गुणांनुसार कॉलेज निवड, ऑनलाइन फॉर्म भरणे, ऑप्शन फॉर्म, डॉक्युमेंट वेरिफिकेशन, तसेच करियर संधी याबाबत अडचणी येतात .यासाठी महाविद्यालयाने अनुभवी प्राध्यापकांच्या माध्यमातून अभियांत्रिकी व डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन देण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल देशमाने यांनी दिले
यावेळी महाविद्यालयाचे अध्यक्ष रविंद्र गायकवाड यांनी बोलताना म्हणाले की विद्यार्थ्यांनी या सुविधेचा योग्य लाभ घ्यावा अशी आव्हान त्यांनी केले. तसेच अभियांत्रिकी व डिप्लोमा क्षेत्रात करिअरच्या विविध संधी उपलब्ध असून योग्य मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना उज्वल भवितव्य घडवण्यास मदत होणार असल्याची त्यांनी सांगितले या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Post Views: 12