पंढरपूर – पंढरपूर शहरात गेल्या दोन,तीन महिन्यापासून ५,१० आणि २० रुपयांची नाणी तसेच १०,२० आणि ५० रुपयांच्या नोटांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना व्यवहार करतानाअडचणी निर्माण होत आहेत. यासाठी येथील व्यापारी महासंघाच्या वतीने शहरातील स्टेट बँक आँफ इंडियाच्या व्यवस्थापकांना निवेदन देवून सुट्टे पैसे आणि नोटा अशी सुमारे १ कोटी रुपयांची उपलब्धता करुन देण्यात यावी अशी मागणी करण्यात आल्याची माहिती येथील व्यापारीमहासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर यांनी दिली.
सुट्टे पैसे आणि नोटांच्या तुटवड्या संदर्भात माहिती देताना व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर यांनी सांगितले की, पंढरपूर शहर हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण आहे. या ठिकाणी रोज सुमारे १ लाखाहून अधिक भाविकांची ये-जा असते. शहरातील हॉटेल व्यवसायिक, छोटे किरकोळ दुकानदार, फळ विक्रेते, प्रासादिक दुकाने व अन्य छोट्या व्यवसायिकांना सुट्टे पैसे (नाणी) व १० रू., २० रू., ५० रू. च्यानोटा व्यवहार करणेसाठी गरजेचे असतात. मात्र पंढरपूर शहरात गेल्या चार महिन्यांपासून चिल्लर व सुट्ट्या पैशांची अत्यंतिक कमतरता भासत आहे. त्यामुळे व्यवहार करताना अडचणी येत आहेत. दरम्यान साधार
णपणे येत्या दोन महिन्यावर महाराष्ट्रातील सर्वात मोठी असलेली आषाढीयात्रा तोंडावर येवून ठेपली आहे. यात्रेत तर सुट्ट्या पैशांची अत्यंत गरज भासते. तरी वरीलनिवेदनाचा सहानुभूतीपुर्वक विचार करून व शहारातील व्यापाऱ्यांची गरज लक्षात घेवूनव येणारी आषाढी यात्रा विचारात घेवून लवकरात लवकर सुमारे १ कोटी रूपयांची चिल्लर(नाणी) व १० रू., २० रू., ५० रू. च्या नोटांची उपलब्धता आपल्या शाखेतून सर्वव्यापाऱ्यांना हवी तेवढी रक्कम उपलब्ध करून द्यावीअशा मागणीचे निवेदन येथील स्टेट बँकेचे व्यवस्थापक आश्रय दीक्षित यांना बुधवारी देण्यातआले. यावेळी व्यापारी महासंघाचे सदस्य सोमनाथ डोंबे, रा.पां.कटेकर, राजुशेठ भट्टड,कौस्तुभ गुंडेवार,शिरीष पारसवार आदी व्यापारीरबांधव उपस्थित होते.
———————-
चौकट : ( व्यापारी महासंघाच्या मागणीला यश )
व्यापारी महासंघ,पंढरपूरच्या शिष्ट मंडळाने येथील भारतीय स्टेट बॅंक पंढरपुर शाखेचे अधिकारी आश्रय दिक्षित यानां निवेदन देवून त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी श्री. दिक्षित यांनी सांगितले की बेलापूर येथील रिझर्व्ह बँकेच्या शाखेतून लवकरात लवकर चिल्लर मागवून घेऊन ज्या व्यापाऱ्यांना गरजआहे त्यांना देण्यात येईल. दरम्यान बँकेने या अगोदरच दर शनिवारी अशी सुट्टी नाणी व्यापाऱ्यांना उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ज्यांना गरज आहे अशा व्यापार्यांनी दर शनिवारी बॅंकेच्या कामकाज वेळेत चिल्लर सुट्टी नाणी घेऊन जावीत असे सांगितल्याची माहिती देखील व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सत्यविजय मोहोळकर यांनी दिली.
Post Views: 10