सायकल वरून पडल्याने साठ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू
सोलापूर – सायकल वरून पडल्याने एका 60 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवार पेठ येथे बुधवारी सायंकाळी पाच वाजता घडली .
कैलास किसन महाले (वय 60 वर्ष , रा . सोमवार पेठ सोलापूर ) असे त्या मयत सायकल स्वराचे नाव असून ते बुधवारी सायंकाळी पाच वाजता राहत्या घराबाहेर सायकलवरून निघाले असताना अचानक चक्कर येऊन ते खाली पडून बेशुद्ध झाले . त्यांना उपचाराकरिता येथील शासकीय रुग्णालयातून नातेवाईक मनोज महाले यांनी सायंकाळी सहा वाजता दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले .
कामती येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने पादचारी तरुण जागीच ठार
सोलापूर – भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेने एक ३० वर्षीय पादचारी तरुण गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्याची घटना मंगळवेढा रोडवरील कामती खुर्द (ता.मोहोळ) येथे बुधवारी सायंकाळी सात वाजता घडली.
अतुल रघुनाथ शिंदे (वय ३० वर्ष, रा. कामती खुर्द, ता.मोहोळ) असे मयताचे नाव आहे. तो बुधवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास कामती येतील हॉटेल सुयश येथे रस्ता क्रॉस करीत होता. त्यावेळी अज्ञात वाहन धडकल्याने डोकीस मार लागून तो बेशुद्ध झाला होता. त्याला रात्री येथील शासकीय रुग्णालयात आकाश शिंदे (पुतणे ) यांनी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
पैशाच्या व्यवहारातून तरुणाला फायटिंग मारहाण
सोलापूर – पैसे देणे घेण्याच्या कारणावरून एका तरुणाला लोखंडी फायटरने मारहाण करून जखमी करण्यात आल्याची घटना अलकुंटे चौक येथील मैदानात आज गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली .
हिरालाल छत्रसिंग जमादार (वय 32 वर्ष , रा . बापूजी नगर , उत्तर सदर सोलापूर ) असे त्या जखमी तरुणाचे नाव आहे .तो आज सायंकाळी अलकुंटे चौक येथील मैदानावर असताना पैशाचे व्यवहारातून त्याला निलू जयसिंग पत्तेवाले व इतर दोन जणांनी मिळून फायटरने मारहाण केली . यात डोक्याला जखम झाल्याने त्याला उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात मित्र शितल खंडेवाले यांनी सायंकाळी दाखल केले .
Post Views: 17