Friday, May 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बार्शी शहरात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम

तरुण भारतbyतरुण भारत
May 22, 2026
in crime
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बार्शी – बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने दि. 19 मे 2026 रोजी शहरातील विविध भागांत अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबवत हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगारावर धडक कारवाया केल्या. पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत सहा जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा व महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बार्शी शहरातील देशमुख प्लॉट, ख्रिश्चन स्मशानभूमी परिसरात फिरोज हबीब सय्यद (वय 40, रा. गाडेगाव रोड, बार्शी) हा इसम हातभट्टी दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून त्याच्याकडून 6 लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची किंमत 600 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर कसबा पेठ येथील बेदराई विहिरीजवळ पत्र्याच्या शेड परिसरात नितीन दत्तात्रय वीर (वय 27, रा. बारंगुळे प्लॉट, बार्शी) हा इसम देशी-विदेशी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. त्याच्याकडून 24 पाऊचमध्ये भरलेली 6 लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. या मुद्देमालाची किंमत 600 रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या कल्याण मटका जुगारावरही पोलिसांनी एकाच दिवशी सलग छापे टाकले.
 एसटी स्टँड शेजारील राजे टपरी परिसरातून विलास दावित रणदिवे (वय 50, रा. सोलापूर रोड, बार्शी) याला पकडून त्याच्याकडून 160 रुपये रोख रक्कम, अंक आकडे लिहिलेला कागद व बॉलपेन जप्त करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण सभागृहासमोरील महात्मा गांधी शॉपिंग सेंटरच्या पाठीमागील परिसरात रविंद्र तानाजी दराडे (वय 33, रा. खुरपे बोळ, बार्शी) हा इसम मटका जुगार चालवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याच्याकडून 380 रुपये रोख रक्कम, अंक आकडे लिहिलेली चिठ्ठी व बॉलपेन जप्त केले.
 तसेच वडर गल्ली शेजारील जयसिमा टपरी परिसरातून प्रशांत वसंत बारंगळे (वय 43, रा. नाळे प्लॉट, बार्शी) याच्यावर कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून 130 रुपये रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आले.
एसटी स्टँड परिसरातील लालपरी हेअर स्टाईल मेन्स पार्लरजवळ सतीश गोविंद सावळे (वय 54, रा. सावळे चाळ, सोलापूर रोड, बार्शी) हा इसम मटका जुगार घेत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर छापा टाकून 350 रुपये रोख रक्कम, अंक आकडे लिहिलेली चिठ्ठी व बॉलपेन जप्त केले.
या सर्व कारवायांमध्ये पोकों सचिन राऊत, राहुल उदार, अविनाश पवार, अमोल माने, बाळकृष्ण मुठाळ, सोमवाड, बहिरे,  तसेच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) तसेच महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Post Views: 10
Previous Post

वृद्धाचा जागीच मृत्यू – धडकेने पादचारी तरुण जागीच ठार – तरुणाला फायटिंग मारहाण

Next Post

सोलापुरात शनिवारी नाभिक समाज वधू वर मेळावा, सामुदायिक विवाह सोहळा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सोलापुरात शनिवारी नाभिक समाज वधू वर मेळावा, सामुदायिक विवाह सोहळा

ताज्या बातम्या

द्वारकाधीश मंदिरात ६५१ भक्तांनी केले पारायण

May 22, 2026

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत केला विनयभंग

May 22, 2026

माहेरून पैसे आणले नाहीत म्हणून पत्नीला ठेवले उपाशी

May 22, 2026

इंधनदरवाढ आणि वाढत्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर “मोफत बैलगाडी प्रवास” प्रतिकात्मक आंदोलन

May 22, 2026
श्री साई श्रद्धा संस्थेत आंबा महोत्सव उत्साहात संपन्न

श्री साई श्रद्धा संस्थेत आंबा महोत्सव उत्साहात संपन्न

May 22, 2026
लाडकी बहीण योजनेस स्व. अजितदादा यांचे नाव द्या

लाडकी बहीण योजनेस स्व. अजितदादा यांचे नाव द्या

May 22, 2026
युवकांचा अपमान सहन केला जाणार नाही!

युवकांचा अपमान सहन केला जाणार नाही!

May 22, 2026
जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीची बैठक संपन्न

जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीची बैठक संपन्न

May 22, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0875141

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697