Saturday, October 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

३६ गुण नव्हे, कर्तृत्व महत्त्वाचे; मराठा वधू-वर मेळाव्यात कालबाह्य परंपरांवर प्रहार

तरुण भारतbyतरुण भारत
May 25, 2026
in social
0
३६ गुण नव्हे, कर्तृत्व महत्त्वाचे; मराठा वधू-वर मेळाव्यात कालबाह्य परंपरांवर प्रहार
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – विवाह जुळवताना पत्रिका, मंगळ दोष, ९६ कुळी आणि गुण-जुळवणी यांसारख्या बाबींना अवाजवी महत्त्व दिल्यामुळे अनेक योग्य विवाह प्रस्ताव केवळ पारंपरिक कारणांमुळे नाकारले जात असल्याची खंत व्यक्त करत, ३६ गुण जुळले तरी विवाह मोडतात; त्यामुळे पत्रिकेपेक्षा मुला-मुलींच्या शिक्षण, स्वभाव, कर्तृत्व आणि भविष्याला प्राधान्य द्या असा ठाम संदेश मान्यवरांनी दिला.

मराठा सेवा संघ संचलित मराठा वधू-वर कक्षाच्या वतीने आयोजित ३२ वा विवाह परिचय मेळावा रविवारी (२४ मे) निर्मलकुमार फडकुले सभागृहात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील होते. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेवक मनीष केत, विनोद भोसले, अनंत जाधव, मृण्मयी गवळी, कल्पना कदम, माजी नगरसेवक पद्माकर  काळे, बाळासाहेब माने, माजी परिवहन सभापती राजन जाधव, बिल्डर असोसिएशन चेअरमन दत्ता मुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन आणि जिजाऊ वंदनेने झाली. प्रास्ताविकात सदाशिव पवार यांनी मराठा सेवा संघाच्या वधू-वर मेळाव्यांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
नगरसेवक मनीष केत यांनी मुलांच्या पगारापेक्षा त्यांच्या कर्तृत्वाला महत्त्व देण्याची गरज व्यक्त केली. तर राजन जाधव यांनी विवाह सोहळ्यांतील अनावश्यक खर्च, प्री-वेडिंगसारख्या वाढत्या ट्रेंडवर टीका करत विवाह साधेपणाने करण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात प्रशांत पाटील यांनी मराठा समाजात विवाह जुळवताना येणाऱ्या अडचणी, ९६ कुळी संदर्भातील गैरसमज, पत्रिका आणि मंगळ दोषांवर भाष्य करत या बाबींपेक्षा मुलांच्या कर्तृत्वाकडे पाहण्याची गरज अधोरेखित केली. या मेळाव्यात ४५० हून अधिक वधू-वर आणि पालकांनी सहभाग नोंदवला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, अंबादास सपकाळे, राम माने अभिंजली जाधव, आर. पी. पाटील, प्रकाश ननवरे लता डेरे, प्रीती कदम, राजू व्यवहारे प्रा. जीवन यादव, रमेश जाधव, परशुराम पवार, प्रदीप कळंब, विश्वनाथ गायकवाड, मनोज मोरे, अविनाश गोडसे, दीपक शेळके गोवर्धन गुंड, दत्ता जाधव, प्रकाश डोंगरे, नवनाथ कदम, नितीन मोहिते, सचिन चव्हाण, कल्याण गव्हाणे, राजु मिरकले यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत पवार तर आभार प्राध्यापक लक्ष्मण महाडिक यांनी मानले.

Post Views: 60
Previous Post

माळीनगर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे राबविली स्वच्छता मोहीम

Next Post

आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत श्रुती, आरतीचे यश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत श्रुती, आरतीचे यश

आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत श्रुती, आरतीचे यश

ताज्या बातम्या

#shorts #viral #brekingnews #solapurnews #maharashtranews

October 24, 2026

#shorts #viral #brekingnews #solapurnews #maharashtranews

October 24, 2026

‘नातवाने मोदींना शुभेच्छा दिल्या, त्यात बिघडले कुठे?’ : सुशीलकुमार शिंदे

October 24, 2026

सोलापुरात २५ वर्षे जुन्या सोनमोहर वृक्षाची कत्तल! नागरिकांचा संताप

October 24, 2026
सोने’ म्हणून लुटल्या जाणाऱ्या आपट्याच्या अस्तित्वावर संकट!

सोने’ म्हणून लुटल्या जाणाऱ्या आपट्याच्या अस्तित्वावर संकट!

October 23, 2026
वाढदिवसाचा खर्च टाळून वाघमारे कुटुंबानी केला अनोखा वाढदिवस

वाढदिवसाचा खर्च टाळून वाघमारे कुटुंबानी केला अनोखा वाढदिवस

October 23, 2026
सहाय्य व्यसनमुक्ती केंद्राच्या गौरी जोशी यांना पुरस्कार

सहाय्य व्यसनमुक्ती केंद्राच्या गौरी जोशी यांना पुरस्कार

October 23, 2026
देशातील प्रमुख तीर्थस्थळांना पंढरपूरशी जोडण्याचा प्रयत्न : रेल्वे प्रबंधक डॉ सुजित मिश्रा

देशातील प्रमुख तीर्थस्थळांना पंढरपूरशी जोडण्याचा प्रयत्न : रेल्वे प्रबंधक डॉ सुजित मिश्रा

October 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1402391

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!