अकलूज – माळीनगर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली दिनांक २३ मे रोजी सकाळी सात वाजता माळीनगर प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर वाढलेली झाडे झुडपे , कागद कचरा, कोपरे भिंती झाडून कचरा गोळा करण्यात आला. माळीनगर प्राथमिक आरोग्य केंद्र श्रीहरीनगर परिसरात असून या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये जा असते अश्यावेळी आलेल्या रुग्णांना स्वच्छ परिसर मिळावा आणि येणाऱ्या पावसाळ्यात डास उत्पत्ती होऊ नये यासाठी परिसर स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले असून येत्या काळात माळीनगर परिसरात स्वच्छता आणि सुशोभीकरण यावर भर देणार असल्याचे विराजसिंह निंबाळकर यांनी सांगितले. तसेच माळीनगर जिल्हा परिषद गटातील विकास कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषद पातळीवर मागणी करून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य मारुती लोंढे म्हणाले.
माळीनगर प्राथमिक आरोग्य केंद्र जवळ स्वच्छतेची गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर सहकार महर्षि साखर कारखान्याचे संचालक व माळीनगर ग्रामपंचायतचे सदस्य विराजसिंह निंबाळकर यांनी परिसर स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला यावेळी माळीनगर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी असे सेविका माळीनगर ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी महाविद्यालयाचे विद्यार्थी परिसरातील नागरिक जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत सदस्य यांनी हजेरी लावून सहभाग घेतला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मारुती लोंढे , आरोग्य अधिकारी अमेय फुले , दादासाहेब लवटे यांच्यासह स्थानिक उपस्थित होते.
Post Views: 7